Indrayani River Pollution sakal
पिंपरी-चिंचवड

Indrayani River Pollution : इंद्रायणी नदी प्रदूषणाचे खापर ग्रामपंचायतींवर

इंद्रायणी नदीपात्रातील प्रदूषणाला नदीशेजारील ग्रामपंचायती जबाबदार असल्‍याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- प्रदीप लोखंडे

पिंपरी - इंद्रायणी नदीपात्रातील प्रदूषणाला नदीशेजारील ग्रामपंचायती जबाबदार असल्‍याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिली आहे. ग्रामपंचायतीचे घरगुती सांडपाणी नदीत मिसळत असल्‍याने प्रदूषणात भर पडत असल्‍याचा अहवाल दिला आहे. त्‍याबाबत कारवाई करण्याऐवजी सूचनांचा फार्स प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केला आहे. तर नदी प्रदूषणाचे खापर ग्रामपंचायतीच्‍या माथ्यावर फोडून कंपन्‍यांना मात्र अभय दिल्‍याचे चित्र आहे.

आषाढी वारीनिमित्त २८ व २९ जून अनुक्रमे देहू व आळंदीतून जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. यावेळी राज्यभरातून लाखो वारकरी देहू आणि आळंदीमध्ये दाखल होतात. त्यांना शुद्ध पाणी मिळेल का? प्रदूषित सांडपाणी नदीपात्रात सोडले तर; वारकऱ्यांनी स्नान करायचे कसे? असा प्रश्न नागरिक उपस्‍थित करीत आहेत.

कंपन्‍यांचे सांडपाणी नदीपात्रात

देहूपासून आळंदीपर्यंत नदीच्‍या दोन्‍ही बाजूंना असलेल्‍या केमिकल कंपन्‍यांचे पाणी इंद्रायणीत मिसळत असल्‍याच्‍या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. अनेक कंपन्‍या रासायनिक सांडपाणी नदीपात्रात सोडत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत. त्‍याकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्‍याचा नागरिकांचा आरोप आहे. तर कंपन्‍यांचे पाणी नदीत मिसळत नसल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्‍यानुसार पाण्याचा नमुना घेतला होता. यामध्ये घरगुती सांडपाण्यामुळे नदीला फेस येणे, जलपर्णीत वाढ होत असल्‍याचे स्‍पष्ट झाले. नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी व्ही. व्ही. किल्लेदार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Buses Upgrade : राज्यात एसटी बसेसचे रुपडे पालटणार, बैठक व्यवस्था बदलून नव्याने ३ हजार बसेस रस्त्यावर धावणार

घरकुलचं अनुदान हवं असेल तर २५ हजार दे, अभियंत्याकडून मागणी; १० हजाराची लाच घेताना ACBने केली अटक

leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारी घटना, आई-वडिलांच्या डोळ्यादेखत घेतला अखेरचा श्वास!

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये उष्णतेचा कहर; ४२°C पार तापमानामुळे छोट्या व्यवसायिकांवर मोठा परिणाम

Trimbakeshwar Temple Scam : 3 हजारात 10 मिनिटात त्र्यंबकेश्वराचं दर्शन, विश्वस्त काकासह 2 पुतणे गजाआड; पेड दर्शनाला मंदिर व्यवस्थापनाचा वरदहस्त

SCROLL FOR NEXT