पिंपरी-चिंचवड

इंद्रायणी नदीतून वाळूउपसा; १३ वाळूमाफियांना ठोकल्या बेड्या, सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त 

सकाळन्यूजनेटवर्क

 पिंपरी : चऱ्होली गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीपत्रातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या १३ जणांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर दोन मुख्य सूत्रधार फरारी आहेत. या वाळूमाफियांकडून सुमारे एक कोटी ३१ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

केतन रामदास कोलते (वय २७, रा. बेकोरी), योगेश सुरेश वाळुंज (वय २९, रा. लोणीकंद), संदेश नंदकुमार कारले (वय २५, रा. देवाची आळंदी), दीपक भाऊसो येळे (वय २८, मु पो पारोडी, ता. शिरूर),  अजहर मजहर शेख (वय २९, रा. लातूर), अंकुश अजयराम कुमार (वय १९, रा. बिहार),  अतुल बाबाजी येळे (वय २५, रा. मु पो पारोडी, ता. शिरूर), अर्जुन जीवन चव्हाण, (वय १९, रा. करोळ, ता. पुसद, जि. यवतमाळ), सोमल मौलानी पठाण (२४, ता. औसा, जि. लातूर),  सुधीर बाळू राठोड (वय २५, रा.रा. करोळ, ता. पुसद, जि. यवतमाळ), विलास सुद्राम येळे (वय ३०, रा.  मु पो पारोडी, ता. शिरूर), सारीक आरिफ पठाण (वय ३५, रा. श्रीकृष्णनगर, जि. लातूर), रवीकुमार श्रीराम धारीराम (वय २१, रा. झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. केतन कोलते , सतीश लांडगे व अजय हे मुख्य सूत्रधार असून सतीश आणि अजय फरारी आहेत.

चऱ्होली येथे इंद्रायणी नदीपात्रातून वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. शुक्रवारी (ता. १९) मध्यरात्री चऱ्होली गावच्या हद्दीत नदी पात्रातून वाळू उपसा करताना वाहने आढळून आली. यामध्ये दोन पोकलेन, चार ट्रॅक्तर, ट्रॉली, १४ ब्रास वाळू, १ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT