पिंपरी : निसर्ग चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चार दिवसांपासून उद्योगनगरीतल्या काही भागांमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा अद्याप सुरळीत न झाल्याने या भागातील 250 उद्योजक त्रस्त झाले आहेत. चार दिवसांपासून बंद असणारी उत्पादन प्रक्रिया त्यामुळे कच्चा माल निर्मितीमध्ये येत असणाऱ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे.
गेल्या दोन महिन्यापासून सुरू असणाऱ्या लॉकडाउनमुळे उद्योगनगरीमधील कंपन्यांचे उत्पादन ठप्प झाले होते. काही दिवसांपूर्वी उत्पादन प्रकल्प कार्यान्वित झाली असले, तरी त्याची घडी अद्याप रुळावर आलेली नाही. त्यामध्येच बुधवारी (ता. 3) आलेल्या वादळामुळे उद्योगनगरीतल्या एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमध्ये झाडांची पडझड, वीजतारा तुटण्याचे प्रकार झाले. याखेरीज अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले. या परिसरातल्या काही भागातील वीजपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसल्याने उद्योजक हैराण झाले आहेत.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या परिसरातला वीजपुरवठा अद्याप खंडितच...
दरम्यान, उद्योगनगरीमधील कुदळवाडी परिसरातील काही भाग, टी ब्लॉकमधील पवना इंडस्ट्रीयल सोसायटी, शितोळे वजनकाटा, महासैनिक इंडस्ट्रीयल इस्टेट, जे ब्लॉकमधील काही भाग, तळवडे परिसरातील सोनवणे वस्ती, या भागातला वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद असल्यामुळे इथले उद्योजक अडचणीत सापडले आहेत. महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले असले, तरी त्यांच्याकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ऑर्डर वेळेत देण्यासाठी 35 हजारांचा खर्च...
टी ब्लॉक परिसरातील काही भागात वीजपुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही,. त्यामुळे इथल्या कंपन्यांचे काम बंद आहे. दरम्यान, या परिसरातील एका उद्योजकाला एका कंपनीला वेळेत कच्च्या मालाचा पुरवठा करायचा होता. त्यामुळे त्याने जनरेटर मागवून उत्पादन प्रकल्प सुरू ठेवला, यासाठी त्याला 35 हजार रुपये मोजावे लागले.
वीज पुरवठा करणारी यंत्रणा जुनीच...
उद्योगनगरीतल्या एमआयडीसी पट्ट्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाली आहे. त्यामध्ये बदल करून नवीन यंत्रणा बसवण्याची मागणी, या भागातील उद्योजकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे याठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असल्यामुळे उद्योगांसमोरील समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
उद्योगनगरीमध्ये ज्याठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. शनिवारी दिवसभरात हे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
- राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.