vinaykumar chaubey sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : खंडणीची मागणी होत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा - विनयकुमार चौबे

हिंजवडी-माण येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसंबंधित विविध समस्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कंपनी प्रतिनिधीनींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची फेज एक येथे बैठक घेतली.

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी-माण येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसंबंधित विविध समस्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कंपनी प्रतिनिधीनींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची फेज एक येथे बैठक घेतली.

पिंपरी - वाहतूक समस्येसह माथाडी, औद्योगिक क्षेत्राशी संबंधित तक्रारी असल्यास तसेच खंडणी, पैशाची मागणी होत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी हिंजवडी येथे केले.

हिंजवडी-माण येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसंबंधित विविध समस्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कंपनी प्रतिनिधीनींसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. २१) फेज एक येथे बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपायुक्त काकासाहेब डोळे, वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सुनील पिंजण, अरविंद पवार, विठ्ठल कुबडे, राजकुमार राजमाने, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष के. सुब्रमण्यन यासह विविध आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी, पीएमआरडीए, पुणे मेट्रो, महापालिका, एमआयडीसी या विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायतचे सरपंच उपस्थित होते.

पोलिस आयुक्त म्हणाले, 'सर्व विभाग व पोलिस यांच्या समन्वयाने आयटी पार्क व इंडस्ट्रीजचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील. कंपनीच्या समोर रजिस्टर माथाडी कामगारांचे फलक लावावेत. कोणी, खंडणी, पैशाची मागणी करीत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अथवा इतर काही तक्रारी असल्यास ११२ नंबरवर कॉल करा, तात्काळ मदत पोहोचवली जाईल'.

दरम्यान, इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे निवृत्त कर्नल चरणजितसिंह यांनी विविध प्रश्नासंदर्भात सादरीकरण केले. पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबतचे सादरीकरण केले. दरम्यान, माथाडी अथवा औद्योगिक क्षेत्राशी संबंधित काही तक्रारी असल्यास ९५२९६९१९६६ या व्हाट्सअप क्रमांकावर तसेच piaec.pcpc.mh@mahapolice.gov.in यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच सर्व कंपनी प्रतिनिधींना सुचनपत्रांचे वाटप केले. निवृत्त कर्नल योगेश जोशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT