insulted the on duty police for stopping the Speed Car in pune
insulted the on duty police for stopping the Speed Car in pune 
पिंपरी-चिंचवड

पुणे : भरधाव कार थांबविल्याने ड्युटीवरील पोलिसाला शिवीगाळ 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव जाणारी मोटार थांबविल्याने दोघांनी ड्युटीवरील पोलिसाला शिवीगाळ केली. काळेवाडी येथे घडलेल्या या घटनेप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

बालाजी संतराम वालेकर (वय 24, रा. आझाद कॉलनी, पाचपीर चौक, काळेवाडी), तुषार लहू कोकणे (वय 28, रा. कोकणेनगर, काळेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विक्रांत चिंतामण चव्हाण (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी हे वाकड पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असून रविवारी (ता.13) काळेवाडीतील भारतमाता चौक ते तापकीर मळा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते कर्तव्यावर होते. त्यावेळी आरोपी एका मोटारीतून भरधाव जात असल्याने फिर्यादी यांनी त्यांची मोटार थांबविली. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत शांततेचा भंग केला. तसेच सरकारी काम करण्यास अडथळा निर्माण केल्याने आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT