पिंपरी-चिंचवड

पुणे : दारुच्या नशेत 'त्याने' केले असे काही; ते कृत्यच गावकऱ्यांच्या जीवावर...

सकाळवृत्तसेवा

बेबडओहोळ : दारूच्या नशेत काही व्यक्तींनी विचित्र प्रकार केल्याचे आपण अनेकदा वाचलेले आहेत. परंतु एखादी व्यक्ती आपल्या कृत्याने गावकऱ्यांच्या जीवावरच उठू शकते, असाच काहीसा धक्कादायक प्रकार मावळ तालुक्यातील आढले खुर्द गावात घडला. या व्यक्तीने दारूच्या नशेत गावच्या पाण्याच्या टाकीत रात्रीच्या वेळी विषारी औषध टाकले. मात्र, सुदैवाने पाणीपुरवठा बंद असल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. तळेगाव पोलिसांनी हे कृत्य करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. 

भाऊ नामदेव येवले (वय ४०, रा. आढले खुर्द, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामसेविका कांचन विलास मारकड यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी येवले सोमवारी रात्री दारू प्यायला होता. दारूच्या नशेत तो रात्री सव्वा दहाच्या सुमारास आढले खुर्द गावातील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढला. त्याने त्याच्याकडे असलेले विषारी औषध पाण्यात टाकले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सोमवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात गावातील काही ठिकाणी नुकसान झाले असल्याने सार्वजनिक पाण्याच्या टाकीवरून पाणी सोडण्यात आले नव्हते. यामुळे पाणी पुरवठा पाच दिवस बंद होता. या दरम्यान, आरोपी येवले याने विषारी औषध पाण्यात टाकल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. वेळीच ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्याने पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे मोठा धोका टळला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पोलिसांनी पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
याबाबत सरपंच आशा जगदाळे म्हणाल्या, सुदैवाने कुठलीही मोठी घटना घडली नाही हे महत्वाचे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT