Dhanesh Indore
Dhanesh Indore Sakal
पिंपरी-चिंचवड

सत्तर लाख रुपयांचे पॅकेज नाकारून साकारली आयटी कंपनी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - तो आंबेगाव तालुक्यातील चांदवली खुर्द या छोट्याशा खेड्यातला. सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) झाला. स्वित्झलँडमधील कंपनीत नोकरीला (Job) लागला. ७० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले. पण, त्याला स्वतःच्या जिद्दीवर वेगळं काहीतरी करायचं होतं. आपल्या बुद्धीचा, अनुभवाचा स्वतःसाठी आणि गावातील तरुणांना रोजगार (Employment) उपलब्ध करून देण्यासाठी वापर करायचा, विचार त्याने केला. आणि नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केले. स्वतःची टेकऑर्बीट सोल्युशन नावाची आयटी कंपनी (IT Company) स्थापन केली. कोरोना काळ असूनही दोन वर्षात कंपनीने १२ कोटींचा टर्नओव्हर पूर्ण केला. धनेश इंदोरे या तरुणाची ही कहाणी, सर्वांसाठी प्रेरणादायी.

धनेशचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर गाव सोडून इंजिनिअरींचे शिक्षण पूर्ण केले. परदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. ती करतानाच विविध व्यवसाय केले. शेवटी दुबईतील मोठ्या आयटी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करताना स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी स्वीझरलँडमधील एका कंपनीने ७० लाख रुपये पगाराच्या नोकरीची ऑफर दिली. ती सोडून धनेश मायदेशी परतला.

मार्च २०२० मध्ये भारतासह जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना, चार तरुण इंजिनिअर्सना नोकरीवर घेत बाणेर येथे एका छोट्या फ्लॅटमध्ये धनेशने आपली कंपनी सुरू केली. आज १२५ तरुण नोकरीस आहेत. पहिल्याच वर्षांत कंपनीने दोन कोटींचा टर्नओव्हर पूर्ण केला. त्यानंतर परदेशातील कामे मिळाली. मायक्रोसॉफ्ट, डेल, सॅप, गुगल या कंपन्यांनी धनेशच्या कंपनीला पार्टनरशिपही दिली आहे. त्या जोरावरच आज त्याच्या कंपनीचा टर्नओव्हर दोन वर्षांत बारा कोटींवर पोहचला आहे. येत्या वर्षात टर्नओव्हर ४० कोटींवर नेऊन २५० नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा त्याचा संकल्प आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT