पिंपरी-चिंचवड

आयटीयन्सना 'तारीख पे तारीख' मिळण्याचं खरं कारण...

सुधीर साबळे

पिंपरी : आयटी कंपनींमधील अनेक कर्मचारी दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत नोकरीमध्ये बदल करत असतात. यंदा देखील कोरोनाचे संकट येण्याआधी अनेक जणांनी नवीन नोकरी पक्‍की केली. त्याचे ऑफर लेटर मिळवले. त्याठिकाणी रुजू होण्याचा महिना निश्‍चित करत जुन्या नोकरीचा राजीनामादेखील दिला. मात्र, अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि आयटी कंपन्यांनी नव्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी 'तारीख पे तारीख' देण्याचा खेळ सुरू केल्यामुळे एक हजार आयटीयन्स चिंतेत सापडले आहेत. 

नवीन नियुक्‍ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना कंपन्या रुजू करून घेत नसल्यामुळे यासंदर्भात कामगार आयुक्‍तांकडे तक्रार करण्यात आली आहे. आपल्याला चांगली पगारवाढ मिळावी, म्हणून आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अनेकजण नव्या नोकरीच्या शोधात असतात. प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालावधीत हे प्रमाण सर्वाधिक असते. यावर्षी देखील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक जणांना दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर लगेचच त्यांना कंपन्यांकडून नोकरीवर रुजू होण्याची तारीखदेखील देण्यात आली. मात्र, कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे नव्या कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याच्या तारखा कंपन्यांकडून पुढे ढकलण्यात आल्या.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सुरुवातीला त्यांना 15 दिवसात तुम्हाला रुजू करुन घेऊ, असे सांगण्यात आले होते. आता पुन्हा हा कालावधी 20 ते 25 दिवसांनी वाढविला आहे. या कर्मचाऱ्यांनी जुन्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर कोरोनामुळे या कर्मचाऱ्यांचा नोटीशीचा कालावधी पूर्ण होण्याअगोदरच कंपनीकडून कार्यमुक्‍त करण्यात आले आहे. त्यामुळे हे कर्मचारी नव्या नोकरीवर रुजू होण्याची वाट पाहात बसले आहेत. दरम्यान, अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू झाल्यामुळे आपल्याला मिळालेली नोकरीची संधी हातातून जाते की काय, असा प्रश्‍न या कर्मचाऱ्यांना सतावतो आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अनेक आयटी कंपन्यांनी अनुभवी कर्मचाऱ्यांना नोकरीत घेतले असून, तसे नियुक्‍तीपत्रही दिले आहे. कोरोनाचे कारण पुढे करत अनेक कंपन्या त्यांना रुजू करून घेण्यास विलंब करत आहेत. शहर आणि परिसरातून यासंदर्भातील अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या असून, त्या कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत. याखेरीज संबधित कंपन्यांकडे देखील यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना कामावर लवकर रूजू करून घेण्याची विनंती करण्यात आली आहे. 
- पवनजीत माने, सदस्य, आयटी समिती, राज्य सरकार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

MBA: नफा आणि निसर्ग दोन्ही महत्त्वाचे! MBA मध्ये 'कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी' आणि 'ग्रीन फायनान्स' या नव्या विषयांना मोठी मागणी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

Radhanagari Dam : राधानगरी धरण सेवाद्वार नूतनीकरणासाठी ८८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता

Bilimora Waghai Railway: १०० वर्षांची ‘मिनी ट्रेन’ आजही धावते; बिलीमोरा-वाघई रेल्वे आदिवासींची जीवनवाहिनी

SCROLL FOR NEXT