Jobs esakal
पिंपरी-चिंचवड

IT Engineer Jobs : आयटी अभियंत्यांना मिळेना नोकरी; वर्षभरापूर्वी पदवी मिळविलेले तरुण अजूनही प्रतीक्षेत

आयटी क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे गेल्या वर्षी पास झालेले आयटी व संगणक अभियंते अद्याप नोकरीच्या शोधात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - आयटी क्षेत्रात असलेल्या मंदीमुळे गेल्या वर्षी पास झालेले आयटी व संगणक अभियंते अद्याप नोकरीच्या शोधात आहेत. ज्यांची ऑफ कॅम्पस मुलाखतीद्वारे निवड झाली आहे, अशा उमेदवारांनाही अद्याप कंपन्यांनी रुजू करून घेतलेले नाही.

परदेशातील मंदीचा परिणाम देशातील आयटी क्षेत्रावरही होत आहे. परिणामी, दरवर्षी कॅम्पस इंटरह्यूद्वारे मिळणाऱ्या नोकऱ्यांची संख्या गेल्या वर्षीपासून कमालीची घटली आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडे येणाऱ्या प्रोजेक्टसची संख्या कमी झाल्याने या कंपन्यांनी नवीन भरती करणे कमी केले आहे. परिणामी २०२३ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरीच्या शोधात आहेत.

गेल्यावर्षीपासून आयटी क्षेत्रावर असलेले मंदीचे सावट यंदाही कायम असल्याने या वर्षी पदवी घेणाऱ्या अभियंत्यापुढेही नोकरी मिळविण्याचे खूप मोठे आव्हान असणार आहे. अनेकदा विद्यार्थी एकाच तंत्रज्ञानामध्ये काम करण्यास इच्छुक असतात. मात्र, सध्या मंदीमुळे परिस्थिती वेगळी आहे.

त्यामुळे बेरोजगार राहून निराश होण्यापेक्षा सध्या मिळेल त्या नोकरीची संधी स्वीकारणे आवश्‍यक आहे, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे खूप मोठे आहे. त्यामुळे आपल्याला हवे ते तंत्रज्ञान व जॉब प्रोफाइल भविष्यातही मिळू शकते, असा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

नोकरी शोधताना हे ही करा...

  • वेगवेगळे तंत्रज्ञान आत्मसात करा

  • वैयक्तिक स्तरावर विविध प्रोजेक्ट करा

  • स्वतःला वेळोवेळी अद्ययावत ठेवा

  • कौशल्य विकासाचे विविध अभ्यासक्रम पूर्ण करा

  • नोकरी देणाऱ्या व्यवस्थापनाला आपण केलेल्या प्रकल्पांची माहिती द्या

दरवर्षी आमच्या महाविद्यालयात ८ ते १० कंपन्या कॅम्पस इंटरह्यूसाठी येत असतात. मात्र, मागील वर्षी केवळ तीन ते चार कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. सहा-सात महिने मी नोकरीच्या शोधात आहे; मात्र सध्या मंदीमुळे फार कमी संधी उपलब्ध आहेत.

- विपुल गायकवाड, संगणक अभियंता

अनेक तरुणांना २०२३ मध्ये नोकऱ्या मिळालेल्या आहेत. मात्र, कंपन्यांकडे प्रोजेक्ट नसल्याने त्यांना अद्याप रुजू करून घेण्यात आलेले नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांनी स्वतःला विविध तंत्रज्ञानामध्ये स्वतःला ‘अप टू डेट’ ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही उमेदवाराला रुजू करून घेताना व्यवस्थापनाकडून नव्याने त्याची क्षमता तपासली जाते. त्या वेळी याचा फायदा होतो.

- प्रशांत यादव, विभागीय व्यवस्थापक, अरिच इन्फोटेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT