surveyor girl sakal
पिंपरी-चिंचवड

ITI Admission : ‘आयटीआय’मध्ये मुलींना ३० टक्के आरक्षण; विद्यार्थिनींची ‘सर्व्हेअर’ ट्रेडला अधिक पसंती

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अर्ज नोंदणी व निश्चितीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आशा साळवी

पिंपरी - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेश घेण्यासाठी अर्ज नोंदणी व निश्चितीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पारंपरिक असलेल्या टी पार्लर, इंटेरियर डिझायनिंग अभ्यासक्रमांना मुलींची पसंती आहे. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांत फूड प्रोसेसिंग, इलेक्‍ट्रीशियन, मशिन ऑपरेटर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेकॅनिक, डीटीपी आणि कॉम्प्युटर ऑपरेटर या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांकडे विद्यार्थिनींचा ओढा अधिक वाढला आहे. ५० टक्के विद्यार्थीनींची पसंती ‘सर्व्हेअर’साठी (मोजणी करणारे) असल्याचे ‘आयटीआय’मधील शिक्षकांनी सांगितले.

उद्योग क्षेत्रातूनही या ट्रेडमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे ट्रेड पूर्ण होताच मुलांना रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होते; तर मुलींमध्येही आता वेगळा ट्रेड निवडायचा बदल दिसतो आहे. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास नोकरीची हमी असते. अनेक मुली एक-दोन वर्षे नोकरी करतात.

साधारणत: दरमहा २० ते २५ हजारांची नोकरी मुलींना मिळते. मात्र काही वर्षे नोकरी केल्यानंतर मुली स्वत:चा व्यवसाय सुरू करतात. दर वर्षी आयटीआयमधून उत्तीर्ण विद्यार्थिनींपैकी जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थिनी शिक्षणानंतर दोन ते तीन वर्षांत स्वत:चा व्यवसाय सुरू करतात.

मोरवाडी महापालिका आणि निगडी शासकीय आयटीआयमधील प्रवेश क्षमता दीड हजारहून अधिक असून, त्यात ३० टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. बेसिक कॉस्मेटॉलॉजी, फ्रुट्‌स अँड व्हेजिटेबल्स्‌ प्रोसेसिंग, ड्रेस मेकिंग, इंटेरियर डेकोरेशन अँड डिझायनिंग, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग मेन्टेनन्स अशा अभ्यासक्रमांना विद्यार्थिनींचा चांगला प्रतिसाद आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अभ्यासक्रमांना मुली काही वर्षांत प्राधान्य देत आहेत.

‘सर्व्हेअर’ ट्रेडला प्राधान्य

शासकीय कार्यालयात भूमि अभिलेख कार्यालयात सर्व्हेअरच्या (मोजणी करणारे) जागा आहेत. बांधकाम, शहरी नियोजन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह विविध उद्योगांमध्ये सर्वेक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. जमिनीचे परिमाण मोजणे, सर्वेक्षक नकाशे तयार करण्यात मदत करणे अशा कामांमुळे मोठ्या संख्येने मुली सर्व्हेअर ट्रेडला प्रवेश घेताहेत.

दरवर्षी आयटीआयमधून उत्तीर्ण विद्यार्थिनींपैकी जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थिनी शिक्षणानंतर दोन ते तीन वर्षांत स्वत:चा व्यवसाय सुरू करत असल्याचे दिसून येते.

- शशिकांत पाटील, प्राचार्य कासारवाडी आणि मोरवाडी, आयटीआय

मुलींसाठी आयटीआयमध्ये चांगले ट्रेड उपलब्ध आहे. आता पारंपरिक ट्रेडऐवजी मुलीदेखील वेगळे ट्रेड निवडण्यास पसंती देत असून शासकीय नोकरीसाठी मोठ्या संख्येने मुली ‘सर्व्हेअर ट्रेड’ला प्रवेश घेताहेत.

- शशिकांत साबळे, प्राचार्य, निगडी शासकीय आयटीआय

मुलींच्या पसंतीचे अभ्यासक्रम

  • सर्व्हेअर

  • इलेक्‍ट्रीशियन

  • मशिन ऑपरेटर

  • इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेकॅनिक

  • आरेखक

  • फ्रुट्‌स अँड व्हेजिटेबल्स प्रोसेसिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT