jagannath rath yatra 2022 Jagannath Rathyatra was organized ISKCON temple Ravet sakal
पिंपरी-चिंचवड

‘हरे राम’, ‘हरे कृष्ण’चा नामघोष; रावेतला ‘इस्कॉन’तर्फे भगवान जगन्नाथ रथयात्रा उत्साहात

भक्तिमय वातावरणात रावेत येथील इस्कॉन मंदिरातर्फे जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

आकुर्डी : फुलांनी सजवलेला रथ..., त्यात विराजमान भगवान जगन्नाथ अर्थात भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम व भगिनी सुभद्रा यांच्या मूर्ती. आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या, भगवे झेंडे. टाळ-मृदंगाच्या गजरात ‘हरे राम, हरे राम, राम राम, हरे हरे। हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे।’ या भजनात तल्लीन भाविक अशा भक्तिमय वातावरणात रावेत येथील इस्कॉन मंदिरातर्फे जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली.

रावेत येथील इस्कॉन मंदिरात तीन दिवस जगन्नाथ कथा आणि रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते. रथयात्रेत सहभागी भाविक नामजपात तल्लीन झाले होते. लहान मुलांनाही अध्यात्मामध्ये रुची निर्माण व्हावी, यासाठी लहान मुलांसाठीच जगन्नाथ रथयात्रा महोत्सव काढण्यात आला होता. मंत्र, जप, भजन, कीर्तन यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. रथयात्रा मार्गस्थ होऊ झाल्यानंतर भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबून दर्शन घेतले. समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, एकमेकांमध्ये प्रेम बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी भगवान जगन्नाथांची सेवा आणि रथयात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते.

गोविंद धाम मंदिरातून सायंकाळी पाच वाजता रथयात्रेला प्रारंभ झाला. वृंदावन सोसायटी, विशाल डायमंड सोसायटी, सोनिगरा अंगण, साई सरोज अपार्टमेंट, मंदिराच्या मागील एमआयडीसी रोड, माधव मिठास, शिंदे वस्ती, हिल टॉप सोसायटी आणि पुन्हा गोविंद धाम मंदिर असा या रथयात्रेचा मार्ग होता. रथयात्रेनंतर मंदिरात महाआरती झाली. महाप्रसादाचे वाटप केले. मंदिरातही फुलांची सुंदर आरास केली होती. शुक्रवारी (ता. १) गजवेश दर्शन कार्यक्रम झाला. शनिवारी (ता. २) ५६ भोग उत्सव संपन्न झाला. रविवारी जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली, असे गोपतीदास प्रभुजी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sagar Karivadekar Arrest : सावंतवाडीत मोठी कारवाई! शेअर ट्रेडिंगमधील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मास्टरमाईंड सागर कारिवडेकर अखेर गजाआड

ChatGPT बनला ज्योतिषी! तुमचा हात दाखवा अन् भविष्य जाणून घ्या; वापरुन बघा 'हे' 3 प्रॉम्प्ट, हस्तरेषा वाचण्याचा व्हायरल ट्रेंड

Video: 'काय संबंध? मनू भाकरला वैभव सूर्यवंशीबद्दल प्रश्न का विचारले?' सोशल मीडियावर संतापाची लाट

Salim Wastik: 31 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात! ‘Ex-Muslim’ युट्यूबर निघाला कुख्यात अपहरणकर्ता, वाचा थरारक inside story

Post-Meal Watermelon and Bloating: आरोग्यासाठी चांगलं असलेलं कलिंगड जेवणानंतर खाल्ल्याने पोट का फुगतं? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT