पिंपरी-चिंचवड

खरेदीच्या बहाण्याने आली अन् सोन्याचे दागिने चोरून लंपास झाली

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानात आलेल्या महिलेने दुकानातील पाऊण लाखाचे दागिने लंपास केले. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. 

नारायणलाल राजारामजी माली (रा. शिवसागर बिल्डिंग, विनायकनगर, पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात ज्वेलर्सचे दुकान आहे. एक अनोळखी महिला सोन्याच्या चमक्‍या खरेदी करण्याच्या बहाण्याने या दुकानात आली. फिर्यादी यांची नजर चुकवून आरोपी महिलेने 70 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्‍यांची दोन पाकिटे चोरून नेली. त्यामध्ये वेगवेगळया आकाराच्या 45 सोन्याच्या चमक्‍या होत्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सांगवी पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने संबंधित महिलेची ओळख पटवित असून, परिसरातही चौकशी केली जात आहे. 
दिवाळीमुळे ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये गर्दी असल्याने चोरट्या महिला या गर्दीचा गैरफायदा घेत दुकानमालकांची नजर चुकवून चोऱ्या करीत असल्याचे समोर येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govind Dev Giri: "मी शिवरायांचा अनुयायी, पळपुटा नाही..." स्वामी गोविंदगिरींनी राम मंदिर ट्रस्ट कोषाध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या अफवा फेटाळल्या

Satara Crime: विश्वासाला तडा! आदर्की फाट्यावर वैद्यनाथ ऑइलच्या दुकानातून १२.७४ लाखांचा अपहार; बहीण-भावावर गुन्हा

Live News Update Marathi: भावली धबधबा मारहाण प्रकरणात नऊ जण अटकेत, एक कुख्यात आरोपी अद्याप फरार

Supreme Court: सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाचे २८ निर्णय का रद्द केले; नेमकं काय घडलं होतं, काय होतं प्रकरण?

Mumbai Rain: मुंबईकरांनो, पुढील ४ दिवस धोक्याचे! समुद्राला भरती येणार, उंच लाटा उसळणार; BMCकडून मोठा अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT