पिंपरी-चिंचवड

Video : कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या प्लाझ्मा थेरपीबद्दल जाणून घ्या...

सुवर्णा नवले

पिंपरी : सध्या कोरोनावर कोणतीही लस व रामबाण उपाय नाही. मात्र, प्लाझ्मा थेरपी विषाणूवर मात करून रुग्णांमधील प्रतिकारक्षमता वाढविण्याचे काम करत आहे. ही पूर्ण प्रक्रिया रक्तातून पार पडत आहे. एखाद्याला जीवनदान देणाऱ्या या वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान रक्तातील अनेक घटकांचे विलगीकरण होते. याविषयी दात्यांना कुतुहल आहे. विषाणू व जिवाणूजन्य आजारावर मात केलेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवून विषाणूशी लढा देते. त्यातून विषाणूला मारण्यासाठी प्रतिपिंड तयार होऊन ते परिणामकारक औषध ठरत आहे. परिणामी, दुसऱ्या व्यक्तीसाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्लाझ्मा हा अफेरेसिस स्वयंचलित मशीनच्या (चिकित्सा प्रक्रिया) माध्यमातून जमा केला जातो. ही अत्यंत सुरक्षित प्रक्रिया आहे. 30 मिनिटांच्या प्रक्रियेत रक्तांच्या तपासण्या करूनच प्लाझ्मा दान केले जाते. प्रथम पाच मिली रक्त काढून व्यक्ती प्लाझ्मासाठी पात्र आहे का, याची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्तगट जुळवणी केली जाते. रक्तातून संक्रमित होणारे आजारांच्या (कावीळ, एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग) तपासण्या केल्या जात आहेत. रक्तात काही दोष आढळल्यास प्रक्रिया थांबते. तपासणीनंतर रक्तवाहिन्यातील रक्तपेशी व रक्तजल वेगळे करून पांढऱ्या व लाल रक्तपेशी, रक्तबिंबीका (प्लेटलेट्‌स), क्रायोप्रेसिपिटेट पुन्हा दात्याच्या शरीरात सोडले जातात. प्लाझ्मा जमा केल्यानंतर तो सुरुवातीला चार तास 80 डिग्री सेल्सिअस थंड तापमानाला व 40 डिग्री सेल्सिअसला एक वर्षापर्यंत साठवून ठेवता येणे शक्‍य आहे.

अशी आहे प्रक्रिया 

अफेरेसिस मशीनला तीन पिशव्यांचे कीट जोडलेले असते. एका पिशवीत पातळ पदार्थ प्लाझ्मा जमा होतो. तर दुसऱ्या व तिसऱ्या पिशवीत उर्वरीत पेशींचा घटक जमा होतो. जो दात्याच्या शरीरात सोडला जातो. या प्रक्रियेदरम्यान रक्ताची गुठळी तयार होऊ नये, याकरिता दात्याच्या शरीरात सायट्रेट रसायन रक्तात सोडले जाते. दात्याला थंडी वाजणे, जीभ, ओठ, हाताची बोटे बधीरपणा येऊ नये, त्यासाठी चार ते पाच कॅल्शिअमच्या गोळ्या दिल्या जात आहेत.

या अटींचे करा पालन 

कोरोनाबाधित बरे होऊन गेलेली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला जीवनदान देऊ शकते. एक व्यक्ती प्लाझ्मा दान करताना 400 ते 500 एमएल प्लाझ्मा दान करू शकते. पहिले 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांतून एकदा पुन्हा प्लाझ्मा देऊ शकतो. व्यक्तीचे वजन कमीत कमी 55 असायला हवे. हिमोग्लोबिन 12.5 च्या पुढे असणे गरजेचे आहे. दात्याने दोन तासांपूर्वी धुम्रपान करता कामा नये. 12 तास अगोदर अल्कोहोल घेता कामा नये. प्लाझ्मादानानंतर शरीरातील कोणतीही प्रतिजैविके कमी होत नाहीत. ती पुन्हा तयार होत आहेत.

प्लाझ्मा दानाने कोणताही शारीरिक तोटा होत नाही. एखाद्या व्यक्तीला थोड्या प्रमाणात खाज सुटणे, थंडी, ताप येऊ शकतो. मात्र, यावर त्वरीत उपचार करता येणे शक्‍य आहे. समुपदेशन करूनच थेरपी केली जाते. रक्तघटकांच्या संक्रमणाचे समंतीपत्र डोनर व नातेवाइकांकडून भरून घेतले जात आहे.
- डॉ. तुषार पाटील, वायसीएम रक्तपेढी प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT