krishna-prakash Sakal
पिंपरी-चिंचवड

कृष्ण प्रकाश यांच्या मुदतपूर्व बदलीची चौकशी व्हावी

माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुदतपूर्व बदलीची चौकशी व्हावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू.

सकाळ वृत्तसेवा

माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुदतपूर्व बदलीची चौकशी व्हावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू.

पिंपरी - माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुदतपूर्व बदलीची चौकशी व्हावी, अन्यथा न्यायालयात दाद मागू. तसेच त्यांच्याबाबत व्हायरल झालेल्या पत्रातून त्यांची बदनामी झाली असून या पत्राचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शहरातील विविध संस्था संघटनांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, माजी नगरसेवक धनराज बिर्दा, अंकुश कानडी, रिपाईचे वाहतूक आघाडी अध्यक्ष अजीज शेख, बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, शिवशाही युवा संघटनेचे शिवशंकर उबाळे, छावा संघटनेचे अध्यक्ष धनाजी येळेकर आदी उपस्थित होते.

कृष्ण प्रकाश यांच्यावर राजकीय फायद्यासाठी दबाव होता का? त्यांच्याकडून काही चुकीचे कामे करून घेण्याचा प्रयत्न प्रस्थापित राजकीय पक्षांनी केला होता का? असे प्रश्न बाबा कांबळे यांनी उपस्थित केले. चुकीचे कामे करण्यास नकार दिल्याने अचानक त्यांची बदली केल्याचा दावाही त्यांनी केला. व्हायरल पत्राची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेला कळायला हवी. त्यांच्या बदलीच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी करणार आहे. चौकशी न झाल्यास न्यायालयात दाद मागणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानव कांबळे म्हणाले, ‘कृष्णप्रकाश यांनी लोकाभिमुख प्रक्रिया राबविली. सर्वसामान्य लोकांना न्यायप्रक्रियेत त्यांनी संधी दिली. सध्या त्यांच्यावर वैयक्तिक हेवेदावे करून अर्ज केले जातात’.

राहुल डंबाळे म्हणाले, ‘गृहमंत्र्यांनी याप्रकरणी निवेदन करुन खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी व दबावातून केलेली बदली रद्द करावी.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT