पिंपरी-चिंचवड

Video : ठेकेदार म्हणाला, "तुम्ही गावी कसे जाता, ते बघतोच..." त्यात पोलिसांनीही...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पोलिसांची परवानगी न मिळाल्याने छत्तीसगड येथील मूळगावी जाण्यासाठी देहूरोड येथील साईनगरमधून आलेल्या बांधकाम मजूर कुटुंबांना तब्बल 10 तासांपेक्षा अधिक काळ एसटीने जाण्यासाठी वाट पहावी लागली. मात्र, अखेरपर्यंत परवानगी मिळाली नसल्याने परत देहूरोडला जाण्याचा निर्णय त्यांना नाइलाजास्तव घ्यावा लागला. 

मागील चार दिवसांपासून राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतील मजूरांना त्यांच्या मूळगावी पाठविले जात आहे. हे ऐकून देहूरोड येथील 11 जणांचे बांधकाम मजूरांचे कुटुंब सकाळी 6 वाजता वल्लभनगर एसटी स्थानकावर येऊन थांबले. मात्र, त्यांचा पोलिसांच्या यादीत समावेश नसल्याने त्यांना त्यांच्या मूळगावी जाता आले नाही. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संतोष कुमार साहू म्हणाले, "आम्ही सर्वजण बांधकाम मजूर असून गवंडी, बिगारी काम करतो. आमच्या सर्वांची वैद्यकीय तपासणी झाली असून, देहूरोड पोलिस ठाण्यातही आमचे नाव नोंदविले आहे. वल्लभनगर येथून गावाला जाण्यासाठी गाड्या सोडत असल्याचे कळाले. त्यामुळे आम्ही वल्लभनगर येथे आलो. मात्र, पोलिस परवानगी मिळाली नसल्याचे कारण देत आम्हाला बसप्रवास करू दिला गेला नाही. आमच्यापैकी एकजण देहूरोड पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली. परंतु, पोलिसांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही.'' धनीराम लोधी म्हणाले, "आम्हाला गावी जायचे आहे. परंतु, आमचा ठेकेदार सोडत नाही. तुम्ही गावी कसे जाता? हे पहातो, असे तो म्हणाला आहे. मात्र, आम्ही गावी जाणारच आहोत. बसने नाहीतर ट्रकने जाऊ. अन्यथा पायी देखील जाऊ. पण, गावी जाऊच.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

देहूरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनिष कल्याणकर म्हणाले, "आमच्याकडील यादीत या कुटुंबांचे नाव नाही. त्यामुळे आमच्याकडून त्यांना गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे पाठविलेल्या अर्जांत त्यांचे नाव आहे, की नाही हे तपासावे लागेल.'' 

15 गाड्यांमधून 509 प्रवासी रवाना 

वल्लभनगर आगारामधून दुपारी 1 वाजता गाड्या सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत छत्तीसगड, मध्यप्रदेशातील 509 मजूरांना गोंदिया, धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर सोडण्यात आले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

VIDEO : बस चालवत असतानाच चालकाला अचानक आला हृदयविकाराचा झटका; मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रवाशांचे प्राण वाचवले, पण स्वत:...

Kolhapur Circuit Bench : 40 वर्षे लढून मिळवलेल्या कोल्हापूर सर्कीट बेंच विरोधात याचिका, पण एका सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण निकाली

SCROLL FOR NEXT