Kamshet Tunnel Landslide sakal
पिंपरी-चिंचवड

Landslide : कामशेत बोगद्याच्या तोंडावर दरड कोसळली

मावळ तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर कामशेत बोगद्याच्या तोंडावर मुंबई मार्गावर दरड कोसळली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कामशेत - मावळ तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर कामशेत बोगद्याच्या तोंडावर मुंबई मार्गावर दरड कोसळली आहे. गुरुवारी (२७ जुलै) रात्री ८.४५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कामशेतचा मोठा बोगदा संपल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही दरड आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. खंडाळा घाटातील धोकादायक दगड काढण्याचे काम झाल्यानंतर दुपारी अडीच नंतर मुंबई मार्ग सुरु करण्यात आला.

आता या घटनेमुळे मुंबई मार्ग पुन्हा विस्कळीत झाला आहे. घटनेची माहिती समजताच द्रुतगतीमार्गावरील देवदूत यंत्रणा व आयआरबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मार्गावर आलेले दगड व माती बाजुला काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT