पिंपरी-चिंचवड

धक्कादायक! क्वारंटाइन सेंटरमधील नाश्‍त्यात सापडल्या अळ्या, कुठे घडला हा प्रकार वाचा 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : एकीकडे महापालिका प्रशासन कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. परंतु, प्रत्यक्षात रुग्णांपर्यंत अनेक सोयी सुविधा पोचत नसल्याचे दिसत आहे. चिंचवड येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये आज (ता.7) दुपारच्या जेवणात माश्‍या, तर चाकण - म्हाळुंगे म्हाडा इमारतीतील क्वारंटाइन सेंटरमध्ये सकाळच्या नाश्‍त्यात अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे येथील रुग्णांचा आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पंधरा दिवसांपूर्वी आकुर्डी आणि मोशी येथील क्वारंटाइन सेंटरमधील निकृष्ट जेवणाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यापाठोपाठ आता चिंचवड ईएसआय हॉस्पिटलमध्ये माश्‍या आढळल्या. रोजच निकृष्ट दर्जाचे जेवण या हॉस्पिटलमध्ये येत असल्याने हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये नाराजी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चाकण केंद्रामध्ये देखील जेवणात अळ्या 

म्हाळुंगे चाकण येथे भोसरी- महात्मा फुलेनगर परिसरातील काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी देखील सकाळच्या नाश्‍त्यात अळ्या सापडल्या आहेत. ही अत्यंत गंभीर बाब  रुग्णांनी जवळच्या नातेवाइकांना फोनद्वारे सांगितली. जेवणात वारंवार अळ्या सापडत असल्याने प्रशासन रुग्णांच्या आरोग्याविषयी असंवेदनशील वागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शरण शिंगे यांनी केला आहे. महात्मा फुले नगरमध्ये प्रशासन कोणत्याही प्रकारे योग्य उपाययोजना आखत नाही. वस्तीमध्ये एकूण 80 रुग्ण सापडले असल्याची माहिती मिळत आहेत. अजूनही सक्रिय रुग्ण वाढण्याचा धोका जास्त आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये काहीच सेवा सुविधा उपलब्ध नाही. नागरिक भयभीत झाले आहेत. याबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी फोन उचलला नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे म्हणाले, "आमच्याकडे जोपर्यंत तक्रार येत नाही, आम्हाला कारवाई करता येत नाही. नागरीकांनी 1800222365 या क्रमांकावर तक्रार करावी.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT