leopards Sakal
पिंपरी-चिंचवड

भक्ष्याच्या शोधातच बिबटे हिंजवडी आयटीत

हिंजवडी आयटी परिसरातील मानवी वस्त्यांमध्ये सतत बिबटे येऊ लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा त्यांचे दर्शन झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी आयटी परिसरातील मानवी वस्त्यांमध्ये सतत बिबटे येऊ लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा त्यांचे दर्शन झाले आहे.

वाकड - हिंजवडी आयटी (Hinjewadi IT) परिसरातील मानवी वस्त्यांमध्ये सतत बिबटे (Leopard) येऊ लागले आहेत. गेल्या तीन महिन्यांत तीन वेळा त्यांचे दर्शन झाले आहे. वनखाते व वन्य अभ्यासकांच्या मते या भागात विकासाच्या नावाखाली डोंगर व जंगलाची झालेली तोड आहे. साहजिकच जंगलातील खाद्य संपल्याने बिबटे वस्त्यांमध्ये भक्ष्याच्या शोधात (Food Searching) शिरत आहेत. यातूनच कासारसाई, नेरे, दत्तवाडी, मारुंजी, जांबे तसेच आयटी क्षेत्रातील काही भागांमध्ये बिबट्या ठाण मांडून आहे.

आयटीच्या विस्तृत पट्ट्यात पूर्वी केवळ शेती हेच व्यवसायाचे प्रमुख आणि एकमेव साधन होते. या भागातील लोकसंख्याही अत्यल्प होती. मात्र, वीस वर्षांपूर्वी शेकडो एकरावर जंगल व डोंगराच्या आयटी पार्क वसले. रोजगारानिमित्त देशाच्या काना-कोपऱ्यांतून कामगारांचे प्रचंड लोंढे वाढले. आयटीवर आधारित असंख्य कंपन्या आल्या. त्याला पूरक उद्योग-व्यवसाय सुरू झाले. नंतर पायाभूत सुविधांच्या नावाखाली विकास सुरू झाला. बांधकाम व्यावसायिक हळूहळू जंगलाकडे वळले.

‘निसर्गाच्या सानिध्यात घर’ अशी जाहिरात करत अनेक व्यावसायिकांनी डोंगर आणि जंगलावर घाव घातला. नेरेत एका मोठ्या बहुचर्चित टाऊनशिपसाठी महाकाय डोंगर चक्क अर्धा फोडण्यात आला. त्यामुळे बिबट्या किंवा वन्य प्राण्यांचे जंगलामधील वास्तव्य धोक्यात आले आणि मग तो हळूहळू मनुष्य वस्तीकडे वळला. मात्र, कासारसाई, नेरे, दत्तवाडी या भागांमध्ये सध्या उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्या वन्य प्राणी आता जंगलाऐवजी उसाच्याक्षेत्रात अस्तित्वात आहेत त्यामुळेच या भागांत बिबट्या दिसून येत आहे.

वनविभाग वेळोवेळी या गावांमध्ये जाऊन विविध माध्यमांद्वारे बिबट्यांबाबत जनजागृती व मार्गदर्शन करत असतो. लोकांनी स्वतःच्या संरक्षणाबरोबरच पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती दिली जाते. परिसरातील स्थानिक लोकांना आता बिबट्याची सवय झाली आहे. शेतात खाद्यच उपलब्ध झाले नाही तर कोंबड्या, बकरी, कुत्र्यांच्या शोधात तो मानवी वस्तीत येतो.

- मीरा केंद्रे, वनपाल, पौड वनपरिक्षेत्र

दोन वर्षांतील घटना

  • २०२० - ३ मार्च : सांगावडे (ता. मावळ) येथील उसाच्या फडात दोन बछडे सापडले.

  • २०२१ - या वर्षात कासारसाई भागात अनेकांना समोरून दर्शन झाले. याचे व्हिडिओही व्हायरल झाले. अनेक भटकी कुत्री, शेळ्या, कोंबड्यांची शिकार

  • मारुंजी भागात अनेकदा महापालिका हद्दीतून सोडण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांकडून मोर, भेकर, रानटी ससे यांची शिकार

  • नेरेतील शेतकऱ्याची दोन वासरे मारली, पाच कोंबड्या पळवल्या

  • २०२२ ः २४ जानेवारी - नेरे येथील उसाच्या शेतीत तीन बछडी सापडली

  • २६ मार्च - मादी बिबट्याने तीन बछडी नेली

  • ७ मार्च - नेरे येथील शेळी फार्मवर हल्ला एका शेळीची शिकार

पाच वर्षांपासून मावळ-मुळशी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. सलग तीन वर्षे त्याची बछडी आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या बछड्यांना मातेपासून दूर करता येत नसल्याने पिंजराही लावता येत नाही. माणसांनी पर्यटनाच्या नावाखाली अमाप वृक्षतोड केली. जंगलात व डोंगरावर फार्म हाउस उभारली जात आहेत. साहजिकच त्याच्या क्षेत्रात अतिक्रमण झाले, तसेच आवाज व गोंधळ वाढल्याने बिबट्यांनी आपल्या मानवी वस्तीतील सुरक्षा असलेल्या उसाच्या शेतीत आश्रय घेतला आहे. मात्र आजवर मुक्या प्राण्यांव्यतिरिक्त माणसावर त्याने हल्ला केला नाही. तरीही रात्रीचे शेतीत जाणे टाळावे आणि गेल्यास मोठमोठ्याने बोलावे. मोबाईलवर मोठ्याने गाणी लावावीत, जेणेकरून तुम्ही एकटे आहात असे वाटू नये. तो भित्रा प्राणी असल्याने निघून जातो.

- नीलेश गराडे, वन्यजीव अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाची रिपरिप, हवामान विभागाचा अंदाज

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

SCROLL FOR NEXT