बिबट्या sakal
पिंपरी-चिंचवड

कोळेवाडी परिसरात बिबट्याचा वावर; एक शेळी व वासरू फस्त

कोळेवाडी परिसरात बिबट्य़ाचा वावर पाहायला मिळत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

आंबेगाव बुद्रुक : नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या कोळेवाडीच्या डोंगर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, डोंगरावर चारायला नेलेल्या गाईचे एक वासरु व एक शेळी बिबट्याने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली आहे. शिवाय गुराख्यांना पट्टेरी वाघही दिसत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान, कोळेवाडीचे रहिवाशी असलेले सुरेश धानवले हे आपली गुरे चारण्यास डोंगरावर गेले असता एक दिवस गाईचे एक वासरू आणि चार सहा दिवसांनंतर शेळी हरवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बरीच शोधाशोध केल्यानंतर बिबट्याच्या पायांचे ठसे गुरे चरत असलेल्या ठिकाणी दिसून आले.

तर आपल्या शेतातल्या गाई म्हशी गावाकडे आणण्यासाठी गेलेल्या दीपक धानवले यांना अगदी दहा ते पंधरा फूट अंतरावर बिबट्या दिसून आला. यापुर्वीही पट्टेरी वाघ शिवारात ग्रामस्थांना आढळून आले आहेत. दहा दिवसांपूर्वी तेलीबाई शिवार परिसरात मोहन नानगुरे आपल्या शेतातील गायी आणायला गेले असता त्यांना दोन वाघ दिसल्याचे त्यांनी सांगितले.

तर एक महिन्यापूर्वी अतुल शेलार यांना तीन पिल्लांसह एक बिबट्या दिसल्याची माहिती दिली. डोंगर शिवारातील वडाचा चौरा जवळ राहणाऱ्या रोहिदास आखाडे व किसन जांभळे यांना पुणे खिंडीत एक वाघीण व एक बछडा दिसल्याचे सांगितले. शिवाय जनावरं कुराणात सोडल्या नंतर काहीच वेळात एक वासरू गायब झाले होते अशीही माहिती अखाडे यांनी दिली.

कोळेवाडी शिवारात फिरणाऱ्या वाघांचे कुठून स्थलांतर झाले आहे हे बघणे गरजेचे आहे. व त्यासंबंधी वनविभागाने योग्य ती खबरदारी घेऊन त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी मागणी कोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते आहे.

' ग्रामस्थांना शिवारात बिबट्यासह पट्टेरी वाघ दिसत आहेत. वनविभागाने याची दाखल घेऊन त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने पाऊल उचलायला हवे. कारण आदिवासी संस्कृतीत वाघालाआराध्य दैवत समजले जाते. वाघ बारस हा सण सर्व आदिवासी बांधव साजरा करत असतात.' - सागर सांगळे, अध्यक्ष आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती

'पट्टेरी वाघ आपल्या परिसरात अढळणे ही दुर्मीळ बाब आहे. ग्रामस्थांना वाघ आढळून येत असेल तर वनविभागाकडून नक्कीच प्रतिबंधक उपाय योजना करण्यात येईल.'- एम.जे.सणस, वनपरिक्षेत्र अधिकारी पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू; २९ मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

SCROLL FOR NEXT