पिंपरी-चिंचवड

चिमुकला आदित्य अखेर आईच्या कुशीत

CD

भोसरी, ता. ८ ः भोसरीतील गवळीनगरमधून शनिवारी (ता. ८) सकाळी आठ वाजता हरवलेला दोन वर्षांचा आदित्य नावाचा मुलगा आमदार महेश लांडगे, पोलिस पथक आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे सकाळी साडेनऊ वाजता पुन्हा आईच्या कुशीत आनंदाने विसावला. सुमारे दीड तासानंतर मुलगा सुखरूप मिळाल्यानंतर त्याच्या आईला आनंदाश्रू अनावर झाले होते.
भोसरीतील गवळीनगरमधील स्वयंभू गणेश मंदिराजवळ सकाळी आठच्या सुमारास दोन वर्षांचा मुलगा लता पायगुडे आणि त्यांच्या मैत्रिणीला कावऱ्या-बावऱ्या स्थितीत रस्त्याने जाताना दिसला. त्याच्या आजूबाजूला कोणीच मोठी व्यक्ती दिसत नसल्याने त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतले व स्वतः जवळ थांबविले. आदित्य अवघ्या दोन वर्षांचा असल्याने त्याला काहीच सांगता येत नव्हते. तेव्हा, लता पायगुडे आणि त्यांच्या मैत्रिणीने जवळच असलेल्या सोसायटी आणि वस्तीमध्ये त्याची विचारपूस करण्यास सुरूवात केली. मात्र, त्यांना यश आले नाही. आमदार महेश लांडगे हे त्याच वेळेस स्वयंभू मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा, लता पायगुडे यांनी आमदार लांडगे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. लांडगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून भोसरी पोलिसांशी संपर्क साधला. भोसरी पोलिसांचे पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आमदार लांडगे, पोलिस आणि नागरिकांनीही परिसरात मुलांच्या नातेवाइकांची शोध मोहीम राबविली. तेव्हा, स्वयंभू मंदिरापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर प्रमिला गौतम आणि विजय गौतम हे त्यांचा दोन वर्षांचा मुलगा आदित्य याचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली. आदित्य एवढ्या लांब जाईल, याची कल्पनाच नसल्याने त्याचे आई-वडील जवळच असलेल्या सोसायटी आणि गल्ल्यांमध्ये आदित्यचा शोध घेत होते.
दरम्यान, आदित्यला आमदार लांडगे यांनी चॉकलेट आणि खाऊ दिल्याने आदित्यही आमदार लांडगे यांच्याजवळ आनंदात होता. लांडगे यांनी आदित्यला त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्त केले. सकाळी आठ वाजता हरवलेला आदित्य दीड तासानंतर सुखरूप मिळाल्याने आई-वडिलांचे डोळे पाणावले होते. जवळपासचे नागरिकही भावुक झाले होते.

अनर्थ टळला
आदित्य हा गवळीनगमधील स्वयंभू मंदिराजवळ सुमारे पाऊण किलोमीटर चालत आला होता. स्वयंभू मंदिराजवळच पुणे-नाशिक महामार्गाचा प्रचंड वर्दळ असणारा सेवा रस्ता आहे. या रस्त्याने वाहनेही भरधाव वेगाने ये-जा करत असतात. त्यामुळे, आदित्य या रस्त्याजवळ आला असता तर त्याच्या जीवितालाही धोका निर्माण झाला असता. परंतु, सुदैवाने तसे काही घडले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT