loan of Rs 1 crore given fake documents Crimes against employees including Axis Bank manager
loan of Rs 1 crore given fake documents Crimes against employees including Axis Bank manager esakal
पिंपरी-चिंचवड

बनावट कागदपत्रांद्वारे दिले कर्ज; अ‍ॅक्सिस बँक व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : बनावट कागदपत्रांद्वारे अनोळखी व्यक्तीला ७४ लाख ९१ हजार रुपयांचे कर्ज मिळवून दिल्याप्रकरणी अ‍ॅक्सिस बँकेच्या तत्कालीन व्यवस्थापकासह गृह कर्ज विभागातील कर्मचारी , प्रतिनिधी व कर्ज घेणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवडमधील अ‍ॅक्सिस बँक येथे घडला. याप्रकरणी शिवकुमार महालिंगप्पा बेलुरे (रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिंचवड येथील अ‍ॅक्सिस बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक, गृह कर्ज विभागातील कर्मचारी, एजंट व अनोळखी व्यक्ती यांनी संगनमताने फिर्यादी यांची बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या नावे अनोळखी व्यक्तीला ७४ लाख ९१ हजार रूपयांचे कर्ज दिले. यातून फिर्यादी व बँकेची फसवणूक केली. हा प्रकार १ जानेवारी ते २० मार्च २०२१ या कालावधीत घडला. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT