पिंपरी-चिंचवड

Video : पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक; अपघातांचं प्रमाण घटलंय एवढं...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : वाहनांचे वाढलेले प्रमाण, खराब रस्ते, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष या कारणांमुळे रस्ते अपघातात वाढ झाली. मात्र, लॉकडाउनमुळे घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने मागील दीड महिन्यांपासून अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त इतर वाहने रस्त्यावर धावली नाहीत. यामुळे या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी 24 मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला. विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असून, अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनांनाच परवानगी दिली जात आहे. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून शहरातील रस्ते अक्षरश: ओस पडले आहेत. यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात 69, फेब्रुवारीत 53, मार्चमध्ये 47; तर एप्रिल महिन्यांत अवघ्या 12 अपघातांची नोंद झाली आहे. एप्रिल महिन्यातील वेगवेगळया 12 अपघातांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले. 


रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे. विविध उपाययोजना करूनही वाहनांचे वाढलेले प्रमाण, खराब रस्ते, वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष यामुळे अपघातच वाढतच आहेत. अशातच लॉकडाउनमुळे का होईना मागील काही दिवसांपासून शहरातील अपघात कमी झाले आहेत. ही शहरासाठी दिलासादायक बाब असून, यापुढे अशाचप्रकारे अपघातांचे प्रमाण कमी होत जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अपघातांची आकडेवारी 

महिना............अपघात...........मृत्यू...........गंभीर जखमी .....किरकोळ जखमी 

जानेवारी............69................29.............43..................8 

फेब्रुवारी............53................26........,.....29..................9 

मार्च..................47...............16...............37..................3 

एप्रिल................12...............8...................5..................0 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 मार्च 2026

Panchang 25 March 2026: आजच्या दिवशी नारायण कवच या स्तोत्राचे पठण आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राज्यरंग - पंजाब : राजकीय अस्थिरतेचा दुसरा अंक

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

SCROLL FOR NEXT