पिंपरी-चिंचवड

आता 'या' कर्मचाऱ्यांची पगार कपात...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनचा फटका केपीओ आणि बीपीओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या काही कंपन्यांनी रात्री काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा नाइट शिफ्ट भत्ता कमी केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पगार कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, यासंदर्भात या कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे तक्रार दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

केपीओ आणि बीपीओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साधारणपणे दर महिन्याला पगारापोटी 15 ते 17 हजार रुपयांची रक्‍कम हातात पडते. त्यामध्ये भत्त्यांचा समावेश असतो. प्रामुख्याने केपीओ आणि बीपीओमध्ये रात्रीच्या वेळेस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'नाइट शिफ्ट' भत्ता देण्यात येतो. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यानंतर काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची ही रक्‍कम कापली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या हातात पगारापोटी अवघी अकरा ते बारा हजार रुपयांची रक्‍कम पडणार आहे. बीपीओ आणि केपीओमध्ये काम करणारे अनेकजण हे बाहेरच्या शहरातील किंवा ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात आलेले विद्यार्थी आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आता कंपन्यांनी भत्ते कापल्यामुळे त्यांना हातात पडणाऱ्या तुटपुंज्या पगारामध्ये खर्च भागवायचा कसा, असा प्रश्‍न त्यांना सतावू लागला आहे. दरम्यान, बीपीओ आणि केपीओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या किमान वेतनामध्ये वाढ करण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून केंद्र सरकारकडे करण्यात आलेली आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही मार्ग निघालेला नाही. केंद्र सरकारने या विषयामध्ये तत्काळ लक्ष घालून हा तिढा सोडवण्याची मागणी आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडून वारंवार करण्यात येत आहे. 

बीपीओ आणि केपीओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पगारामध्ये अनेक भत्त्यांचा समावेश असतो. लॉकडाउनच्या कालावधीत कर्मचारी जर कामावर आला असेल, तर कंपन्यांनी त्याच्या भत्त्यामध्ये कपात करणे चुकीचे आहे. आमच्याकडे यासंदर्भात तक्रारी आल्या असून, त्या आम्ही कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे सादर केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना त्याबाबत योग्य न्याय मिळावा, यासाठी पाठपुरवठा सुरू आहे. 

- पवनजित माने, सदस्य, माहिती तंत्रज्ञान समिती, राज्य सरकार

  • पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील केपीओ व बीपीओंची संख्या : सुमारे 80
  • कर्मचाऱ्यांची संख्या : एक ते सव्वा लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT