Police
Police 
पिंपरी-चिंचवड

सरकारी बाबुंकडूनच लाॅकडाऊनच्या नियमांना खोडा

सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन - कोरोना लाॅकडाऊनसारख्या अटीतटीच्या परिस्थितीत एकीकडे जनसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र लढणारे पोलिस कर्मचारी आणि दुसरीकडे कायदयाचे उल्लंघन करणा-या निकटवर्तीयांची पाठराखण करणारे उच्चपदस्थ पोलिस अधिकारी असा विरोधाभास सध्या पहावयास मिळत आहे. लाॅकडाऊनमध्ये आपल्या निकटवर्तीयांना विशेष वागणूक मिळावी यासाठी सरकारी बाबूंकडूनच लाॅकडाऊनच्या नियमांना खोडा घालण्याचे काम चालू आहे.

लाॅकडाऊननंतर दिड महीना कोरोनामुक्त राहिलेल्या तळेगाव दाभाडे परिसरात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सेकंड होम डेस्टीनेशन म्हणून ख्याती पावलेल्या तळेगावात लाॅकडाऊन बंदोबस्ताला हुलकावणी देत बेकायदेशीरपणे घुसखोरी वाढली आहे. इतर भागात कायम वास्तव्यास असलेले लोक लाॅकडाऊन काळात आपल्या सेकंड होममध्ये तळेगावात येऊन राहत आहेत. बाहेरुन आलेल्या तसेच कामानिमित्त इतर ठिकाणी ये जा करणा-यांनी आपली माहिती प्रशासनास देणे बंधनकारक असतानाही नगरपरिषदेतील नोंदी मात्र नगण्य आहेत. बाहेरुन आल्यानंतर किमान १४ दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक असतानाही बरेच जण सर्रास सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात. यापैकी बरेच जण कसलाही पास अथवा वैद्यकीय तपासणी अहवालाशिवाय रात्रीच्या वेळी चोरीछुपे तळेगावात आलेले दिसतात.

याबाबत आजूबाजूचे रहीवासी तसेच सोसायटीच्या तक्रारीनंतर कारवाई अथवा तपासणीसाठी आलेल्या शासकीय कर्मचार्यांना माहीती न देणे, खोटी माहिती देणे, अरेरावीची भाषा वापरणे, सहकार्य न करणे असे प्रकार या लोकांकडून चालू आहेत. बरेच जण आपल्या संबंधातील शासकीय सेवेतील बडया अधिका-यांची नावे सांगुन, फोन लावून स्थानिक अधिका-यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये विशेषतः पोलिस अधिकारी आघाडीवर आहेत. सर्वेक्षण करणारे शिक्षक, नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच सोसायटीच्या सुरक्षारक्षकांसह अध्यक्षांना वैयक्तिक पातळीवर मारहाणीची धमकी देण्यापर्यंत एका महीला पोलिस अधिका-याने मजल मारली आहे. नाकेबंदीदरम्यान एका मित्राच्या काळया काचांवर कारवाई करणा-या राज्य राखीव दलाच्या जवानाशी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दोन काॅन्सेबलनी हुज्जत घातली.

मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील एका उच्चपदस्थाने आपल्या निकटवर्तीयाला भाजी विक्रीचा परवाना देण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेच्या अधिका-याला केलेला फोन चर्चेचा विषय ठरला. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर ठिकाणी अत्यावश्यक सेवेत कामासाठी ये जा करणारे कर्मचारी, शासकीय यंत्रणेला वेळोवेळी आवश्यक माहीती देताना दिसत नाहीत. होम क्वारंटाईनचे पालन करत नाहीत. प्रवेशद्वारावर कुठलीही तपासणी अथवा विचारपुस न करता रेड काॅर्पेट अंथरावे अशी त्यांची अपेक्षा दिसते.बाहेरील कार्यक्षेत्रातील अधिका-यांचे असेच फोन सध्या लाॅकडाऊन यंत्रणेत काम करणा-या अधिकारी कर्म-यांना चालू आहेत. ति-हाईत ठिकाणच्या शासकीय अधिका-यांच्या या लुडबूडीमुळे पोलिस आणि नगरपरिषद प्रशासन वैतागले आहे. यामुळे कोरोना लाॅकडाऊन यंत्रणेत कार्यरत अधिकारी कर्मचा-यांचे मनोबल खच्ची होत असून शासकीय कामकाजात अडथळा येत आहे. सरकारी बाबूंच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार करण्याचा पवित्रा काही सोसायटयांनी घेतलेला दिसतो आहे.

लाॅकडाऊनकाळात सोसायटीच्या संचालक मंडळांसह स्थानिक प्रशासनाला वेठीस धरणा-या अशा सरकारी बाबूंवर कडक कारवाईची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT