Major difference in the number of corona patients and deaths in Maval 
पिंपरी-चिंचवड

धक्कादायक ! मावळातील कोरोनाचे रुग्ण आणि मयतांच्या संख्येत मोठी तफावत

गणेश बोरुडे

तळेगाव स्टेशन : आयसीएमआर पोर्टलवर नियमितपणे नोंद होत नसल्यामुळे तसेच बरेच रुग्ण अहवाल पाॅझिटीव्ह येऊनही माहिती लपवत असल्याने प्रशासन दैनंदिन जाहीर करत असलेल्या कोविड रुग्ण आणि मृत्यूच्या आकडेवारीच्या विश्वासार्हतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आरोग्य विभागाच्या अधिका-यांकडून मावळ तालुका कोविड संक्षिप्त अहवाल तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत आढळलेल्या रुग्ण आणि मयतांची संख्या नगरपरिषद प्रशासनाकडून प्रसिध्दीमाध्यमांना रोज जाहीर केली जाते. मात्र, जाहीर आकडेवारीत आणि प्रत्यक्षात आढळलेले रुग्ण आणि मयतांची संख्या यात फरक असल्याचे दिसते. दोन्ही अहवालातील रुग्ण आणि मयत संख्या अभावानेच जुळतात.

खाजगी लॅब, आरोग्य विभाग आणि भारतीय आयुर्विज्ञान शंशोधन परिषद  (आयसीएमआर) यंत्रणेतील समन्वयाअभावी रोज जाहीर केली जाणारी कोरोनाबाधित रुग्णांची आणि मृत्यूची आकडेवारी फसवी आणि बुचकळ्यात टाकणारी आहे. बहुतांश रुग्णांचे वय, पत्ते आणि इतर माहितीबाबत देखील साशंकता आहे. अधूनमधून मयतांची आकडेवारी शुन्य दिसली की दिलासा मिळताच पुढच्या दिवशी अचानक वाढलेली रुग्णसंख्या आणि मयतांची आकडेवारी धडकी भरविणारी ठरत आहे. कोविड रुग्णालये आणि खाजगी लॅबकडून पोर्टलवर नोंद करण्यात होत असलेल्या विलंबामुळे सदर प्रकार घडत असल्याचे समजते. लॅब आणि रुग्णालयांकडून पोर्टलवर उशिरा नोंद झाल्यास प्रशासनाकडून तीन-चार दिवसांचे आकडे एकत्रितपणे जाहीर करण्यात येतात.

मृत्यू झाल्यापासून थेट तिस-या चौथ्या दिवशीच्या संक्षिप्त अहवालातील आकडेवारीत तो जाहीर केला जात आहे. आकडेवारी सदोष असल्याने सार्वजनिक ठिकाणी उघडपणे फिरणा-या आजूबाजूच्या कोरोना बाधित रुग्णांविषयी नागरिक अनभिज्ञ राहतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आणखी वाढण्याची भिती आहे. आयसीएमआरच्या पोर्टलवर दैनंदिन माहीती नियमीतपणे अदययावत करण्यासंदर्भात आरोग्य विभागाकडून कसलाही दबाव नसल्यामुळे कोविड रुग्णालये आणि लॅबकडून दिरंगाई होताना दिसते. याबरोबरच तांत्रिक त्रुटी दुर होणे देखील गरजेचे आहे. खाजगी लॅब आणि कोविड रुग्णांलये, कोविड केअर सेंटर यांच्याकडून नियमीतपणे कोरोना बाधित आणि मयत रुग्णांची माहीती अदययावत करुन, विश्वासार्ह आकडेवारी जाहीर केल्यास कोरोनाविरोधी लढयात नागरिकांचा आत्मविश्वास आणि बचावपद्धती प्रबळ होण्यास मदत होणार आहे.

बरेच धनाढ्य आणि राजकारणी कोरोनाबाधित होऊनही माहीती लपवुन ठेवतात. खाजगी लॅबमध्ये तपासणी करुन घेऊन घरीच अथवा शहरातील नामांकित रुग्णालयात उपचार घेतात. शहरी भागातील बरेच तरुण कोरोना पाॅजीटिव्ह असूनही, चक्क गावभर हिंडत आहेत. याबाबत उशिरा माहीती उघड झाल्यावर रुग्णसंख्येचे आकडे फुगल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. - श्रीकांत वायकर (नागरीक)

जोपर्यंत कोविड केअर सेंटर अथवा कोविड रुग्णांलयाकडून रुग्णांचा अहवाल अथवा मृत्यूबाबत लेखी मिळत नाही तोपर्यंत अहवालात नोंद करता येत नाही. ब-याच वेळी माहिती उशीरा मिळाल्यास ती दुस-या दिवशीच्या अहवालात पकडली जाते. - सुप्रिया शिंदे (उपमुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद)

खाजगी कोविड रुग्णालये आणि लॅबला आयसीएमआर पोर्टलवर नियमीतपणे रुग्ण आणि मयत संख्या नोंद करण्याबाबत सक्तीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पोर्टलवर आकडेवारी अपडेट करण्यासाठी आरोग्य विभागाने वाॅर रुम बनवली असून, या संदर्भातील तांत्रिक त्रुटी लवकरच दुर होऊन रुग्णांची दैनंदिन अद्यावत आकडेवारी जाहीर होऊ शकेल. - डाॅ. गुणेश बागडे (नोडल अधिकारी, कोविड कक्ष मावळ तालुका)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT