पिंपरी-चिंचवड

Work From Home असूनही हजारो आयटीयन्सच्या 'या' तक्रारी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : लॉकडाउनच्या कालावधीत आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली असली, तरी या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या 39 हजार कर्मचाऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या तक्रारी राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सिनेटच्या माध्यमातून कामगार आयुक्‍तांकडे केल्या असल्याचे या संघटनेचे सरचिटणीस हरप्रीत सलुजा यांनी सांगितले. 

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर एक महिन्यांच्या कालावधीत या तक्रारी आल्या असून, त्याबाबत लवकर कारवाई करण्यासंदर्भात संघटनेचा कामगार आयुक्‍त कार्यालयाकडे पाठपुरवठा सुरू आहे. 

या आहेत तक्रारी..... 
आयटी कर्मचाऱ्यांनी संघटनेकडे केलेल्या तक्रारींमध्ये काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार कमी केल्याच्या तक्रारी आहेत. आपल्याकडे काम नसल्याचे कारण पुढे करत काहीजण कामावरुन कमी करण्याच्या तयारीत आहेत. सध्या कंपनीकडे काम नसल्यामुळे पुढल्या महिन्यात पगार देता येणार नाही, अशी सूचना काहीजणांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केल्या आहेत, त्यामुळे आयटी कर्मचाऱ्याचा रोजचा दिवस तणावात जात आहे.

लॉकडाउनमुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यास काही काळ लागणार आहे. मात्र, त्याचा परिणाम नोकरीवर व्हायला नको, अशी या कर्मचाऱ्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी पुढे येउन तक्रारी नोंदवल्या असल्याचे सलूजा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे काहीजण हे बाहेरच्या राज्यातले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अनेकांची कंपनी पुण्यात असल्यामुळे काहीजणांनी कर्ज काढून घराची खरेदी केली आहे. पुढल्या महिन्यात पगार झाला नाही, तर घर चालवायचे कसे असा प्रश्‍न अनेकांना सतावतो आहे. त्यामुळे तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा 39 हजारापर्यंत गेला आहे. दरम्यान, लॉकडाउनचा कालावधी वाढला तर त्यामधे वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT