पिंपरी : लॉकडाउनच्या कालावधीत महावितरण कंपनीला गेले तीन महिने ग्राहकांच्या वीजमीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे सध्या येत असलेली बिले तीन महिन्यांच्या रकमेपेक्षा जास्त आहेत, अशा आशयाच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडून केल्या जात आहेत. वीजबिलाच्या दुरुस्तीसाठी पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने तर सभासदांसाठी 'गुगल फॉर्म'च ऑनलाइन पद्धतीने पाठविला आहे.
कोरोनाचा प्रचार, प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक नोकऱ्या, व्यवसाय धोक्यात आले. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनीही अन्य नागरिकांना सोसायटीमध्ये प्रवेशास बंदी घातली. अनेक सोसायट्यांमध्ये अद्यापही ही बंदी लागू आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने नागरिकांना कंपनीचे ऍप मोबाईलवर डाउनलोड करून त्याद्वारे आपल्या वीजमीटरचे रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काही नागरिकांनी रीडिंग ऍपद्वारे पाठविले. मात्र अनेकांनी तसे केले नाही.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वीजबिलाच्या वाढत्या तक्रारी
काही नागरिकांनी गतवर्षीचा मे, जूनमधील वापर आणि यंदाचा मे, जूनमधील वापर सारखा असूनही बिल मात्र, जास्त आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. काही नागरिकांनी जास्त आलेले बिल न भरण्याचा पवित्रा घेतला आहे. वीजमीटर तोडण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी आल्यावर आधी त्यांच्याकडून वीजबिल दुरुस्त करून घ्यावे आणि नंतरच बिल भरावे, अशी भूमिका घेतली आहे. एका नागरिकाला तर एप्रिलमध्ये दुप्पट बिल आले. त्यानंतर मे महिन्यातही पुन्हा दुप्पट बिल आले. घरी तीन महिने नसतानाही दोन वेला दुप्पट बिल आल्याने ते संतप्त झाले आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यासंदर्भात पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष दत्तात्रेय देशमुख यांनी सभासदांसाठी गुगल अर्ज तयार केला आहे. सर्व सभासदांना हा अर्ज पाठविण्यात आला असून त्यामध्ये प्रत्येकाने आपल्या वीजबिलाची नेमकी समस्या मांडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सभासदांनी भरलेले सर्व अर्ज हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
महावितरण कंपनीने काही दिवसांपूर्वी सरासरी बिल दिले होते. ज्यांनी ही बिले भरली त्यांना आता आलेली बिले कमी रकमेची आहेत. तसेच एप्रिलपासून विजेचे दरही वाढले आहेत. मात्र तरीही ज्यांना जास्त बिले आली असतील त्यांच्या बिलांची रक्कम कमी करून देण्यात येईल, असे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
- अरुण देशमुख, प्रवक्ते, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.