Online School Sakal
पिंपरी-चिंचवड

अनेक शाळांची नव्या प्रयोगासहित ‘ऑनलाइन’ शाळा

कोरोनामुळे शाळा व्यवस्था पारंपरिक वर्गामधून ‘डिजिटल प्लॅटफॉर्म्स’वर स्थलांतरित झाली आहे.

आशा साळवी

पिंपरी - कोरोनामुळे (Corona) शाळा (School) व्यवस्था पारंपरिक वर्गामधून ‘डिजिटल प्लॅटफॉर्म्स’वर (Digital Platform) स्थलांतरित झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी मुलांना ऑनलाइन शिक्षणच (Online Education) घ्यावे लागणार असल्याने मागील वर्षाचा अनुभव पाहता अनेक शाळांनी नवे प्रयोग (New Experiment) राबविण्यास सुरुवात केली आहे. काही शाळांनी फ्लिप क्लास तर काहींनी अप्रगत मुलांसाठी कौन्सिलिंग हेल्पलाइन सुरू केली आहे. (Many Schools have Online Schools with New Experiments)

ऑनलाइन शिक्षणातून आनंद मिळत आहे. नियमित वर्गांच्या तुलनेत ऑनलाइन वर्गांमध्ये एकाग्रता अधिक चांगली होते. याशिवाय लेक्चर्स आणि नोट्स पुन्हा बघता येतात, लवकर उठून शाळेत जाण्यापेक्षा घरातून शिकणे सोयीचे आहे, अशी कारणेही मुलांनी दिल्यामुळे बहुतांश शाळांनी ऑनलाइन शिक्षण अधिक आनंदी करण्याकडे भर दिला आहे.

बहुतेक ठिकाणी आठवड्यातील पाच दिवस वर्ग घेण्याचे नियोजन केले आहे. काही मुले स्मार्टफोनच्या माध्यमातून वर्गांना हजेरी लावतात, तर काही लॅपटॉप व डेस्कटॉप वापरत आहेत. टॅब, आयपॅड या साधनांचा वापर उपलब्धतेनुसार आलटून पालटून करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षकांना आधुनिक ट्रेनिंग देण्यात येणार आहे. वर्गपाठ अवघड विचार कौशल्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार. सोपा विचार करून घरी कसा अभ्यास करण्याबाबत शिकविले जाणार आहे. ऑफलाइन शिक्षणावरदेखील भर राहील.

- आदित्य शिंदे, केंद्र व्यवस्थापक, ज्ञानप्रबोधिनी विद्यालय

ज्या मुलांना अध्ययनात अडचणी येत आहेत, अशा मुलांचे यावर्षी रेमेडेशियन केले आहे. त्यांच्याकडे शिक्षक वैयक्तिक लक्ष देणार आहेत. अभ्यासाबरोबरच खेळाची ॲक्टिव्हिटी सुरू राहण्यासाठी स्पोर्टसचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. घरगुती साहित्यातूनच प्रॅक्टिकल शिकवले जाणार आहे. मुलांसाठी कौन्सिलिंग ॲप’ तयार केले आहेत. चार समुपदेशकांच्या मदतीने हेल्पलाइन सुरू केली आहे. याने मुले मोकळा संवाद साधतील.

- अश्‍विनी कुलकर्णी, संचालिका सिटी प्राइड स्कूल

काही गरीब विद्यार्थ्यांकडे अजूनही ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी साधने उपलब्ध नाहीत. शाळेतून स्मार्ट सिटी डिजिटल साहित्यातून अध्ययन-अध्यापन सुरू केले आहे. शाळेचा ब्लॉग, व्हॉट्सॲप लर्निंग झूम मीटिंग या शाळेचा ॲप वापर करीत आहोत. जे विद्यार्थी अजूनही ऑफलाइन आहेत. त्यांच्याकडे नियमांचे पालन करीत त्यांच्या परिसरात जाऊन पालकांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. गरजू विद्यार्थ्यांनाच शाळा पातळीवर शिक्षणासाठी पेन ड्राईव्ह किंवा टॅब देणार आहे.

- दयानंद यादव, शिक्षक महापालिका शाळा क्र.९३ सोनवणेवस्ती

वर्गाशी संबंधित काही गमतीशीर उपक्रम दररोज दिले जात आहेत. ऑनलाइन वर्गांसाठी नावे नोंदवलेले बरेच विद्यार्थी नियमित उपस्थित राहावे लागते. मुले त्यांच्या पालकांची किंवा घरातील कोणाचातरी मोबाईल वापरावा लागत आहे. मात्र, मोबाईल दिवसभर मिळत नाहीत.

- लीना गवारे, पालक, दापोडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT