Maratha Reservation
Maratha Reservation sakal
पिंपरी-चिंचवड

Maratha Reservation : आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, आंदोलकांची भावना; जरांगे पाटलांनी आदेश दिल्यास उपोषणास तयार

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोणाची शेती दुष्काळामुळे पडीक झालेली, तर कोणी कामावरून सुटी काढलेली, तर कोणी उतारवयातही आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले... जरांगे पाटील यांच्यासह पदयात्रेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील बांधव पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले.

सोलापूर, बीड, परळी, विदर्भ, मराठवाडा यासोबतच पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठा बांधवांचाही समावेश होता. जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईपर्यंतचा प्रवास करू गरज पडली तर त्यांच्यासोबत उपोषणालाही बसू असा निश्‍चय या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

अगदी २१ वर्षांच्या तरुणांपासून ते ८५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांतील कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी भावना हे आंदोलनकर्ते व्यक्त करत आहेत.

जरांगे पाटील जेव्हा सराटी येथून निघाले त्याच वेळी त्यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आम्ही गाव सोडले. गावोगावी अठरा पगड जातींच्या लोकांनी आम्हाला निवारा जेवण दिले. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे. मराठाविरुद्ध ओबीसी वाद हा नेत्यांनी तयार केलेला लढा आहे. स्थानिक पातळीवर मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत. आता जोपर्यंत जरांगे पाटील आदेश देत नाहीत, तोपर्यंत आम्ही मागे मागे फिरणार नाही.

- गणेश देशमुख , सोलापूर

जेव्हा जेव्हा जरांगे आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले, तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठिंब्यासाठी माझ्या गावात उपोषण केले. आज या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी मी जात आहे. आताही उपोषणालाही बसण्याची आमची तयारी आहे. फक्त त्यांनी आम्हाला आदेश द्यावा. मराठा शेतकरी कुटुंबांतील मुले शिकण्यासाठी व नोकरी मिळण्यासाठी आरक्षण अत्यंत गरजेचे आहे.

- विष्णू बाबा पवार, आंकोली

मी शेती करतो. आमच्या नऊ एकर शेतीत आम्ही उसाचे पीक घ्यायचो. मात्र, यावर्षी दुष्काळ असल्याने पीक निघाले नाही. राज्यात शेतकऱ्याची हीच अवस्था आहे. जरांगे पाटील आमच्यासाठी लढा देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन आता आमचेही आहे.

- मोहन गव्हाणे, बीड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT