पिंपरी-चिंचवड

'ही' परिस्थिती कायम राहिल्यास चिकनचे भाव आणखीन वाढतील

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाला सुरुवात झाल्यानंतर चिकन खाण्याकडे खवय्यांनी पाठ फिरवली होती. चिकनला मागणी नसल्यामुळे अनेक पोल्ट्री चालकांनी कोंबड्या खड्ड्यात टाकून नष्ट केल्या होता. त्यामुळे कोंबड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. आता कोरोनाचा संसर्ग वाढत असताना मांसाहार करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्यामुळे एक किलो चिकनसाठी 240 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या असणारी स्थिती अशीच कायम राहिली, तर या भावातही वाढ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

...यामुळे वाढलेत भाव

चिकनमधून कोरोनाचा संसर्ग पसरतो, अशी अफवा पसरल्यामुळे अनेक पोल्ट्री चालकांनी आपल्याकडे असणाऱ्या कोंबड्या नष्ट केल्या. त्यामुळे बऱ्याच भागातील पोल्ट्री मोकळ्या झाल्या आहेत. आताच्या परिस्थितीत बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी चिकन, मटण आणि मासे यांची विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मांसाहार करणाऱ्या मंडळीकडून देखील चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील एका दुकानात दिवसभरात 80 किलो चिकनची विक्री करण्यात येत आहे. 
कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी शहरात मावळ, लोणावळा, चाकण, मुळशी या परिसरात असणाऱ्या पोल्ट्रीमधून चिकन येत होते. आता पुरेशा प्रमाणात कोंबड्याच उपलब्ध नसल्याने दुकानदारांना लांबून माल मागवावा लागत आहे, त्यामध्ये वाहतुकीची समस्या देखील मोठी आहे. त्यामुळे चिकनच्या दरामध्ये वाढ झाली आहे. मटणाचे भावदेखील किलोमागे 100 रुपयांनी वाढले आहेत. या दुकानदारांनाही वाहतूक करण्यात मोठी अडचण येत आहे. त्यामुळे नाइलाजाने भाव वाढवावे लागत असल्याचे मटण विक्रेत्याने सांगितले. 

मासळीचे भाव वाढले, पुरवठा कमी... 

मासळीच्या दरातही 100 ते 200 रुपयांची वाढ झाली आहे. पापलेट, कोळंबी, सुरमई, बोंबिल यांना चांगली मागणी आहे. मात्र, पनवेलमधून त्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्यामुळे ग्राहकांची अडचण होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime: दागिन्यांच्या लोभातून बार्शीत महिलेचा खून; शहरातून पाच-सहा दिवसांपासून बेपत्ता,धक्कादायक कारण आलं समाेर!

Pune Rain News: पावसाने झोडपले; पुणेकर कोंडीत अडकले, मेघगर्जना, विजांचा कडकडाट; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल; मदतीसाठी तासभरा ५० फाेन!

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Bank Holiday: आज गुड फ्राइडेनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? पुढचे 2 दिवसही सुट्टी? जाणून घ्या RBIची अपडेट

सगळ्यांसमोर रणवीरने शेफालीला उचलताच भडकली दीपिका, सोशल मीडियावर VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT