पिंपरी-चिंचवड

Video : 'कोरोनामुळे मरण्यापेक्षा पिऊन जगू द्या...' 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : "ना काहींच्या तोंडाला मास्क ना रुमाल...डोक्यावर तळपते ऊन...ना कसली पर्वा फक्त दारू मिळाली पाहिजे. त्यासाठी सकाळपासूनच रांगेत तासनतास..." असेच चित्र बुधवारी (ता. 6) सलग तिसऱ्या दिवशी शहरातील विविध भागात पहायला मिळाले. अक्षरशः काहींनी पोती भरून दारूच्या बाटल्या खरेदी केल्या, तरी काहींनी "कोरोनामुळे मरण्यापेक्षा मद्य पिऊन जगू द्या," अशा बेधडक भावनादेखील व्यक्त केल्या. 

सोमवार (ता. ४) पासून सरकारने दारू विक्रीला परवानगी दिल्याने मद्यप्रेमींची झुंबड उडाली आहे. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडविण्यात आले. दुकानदार व पोलिसांकडूनही खबरदारीच्या उपाययोजना केल्या नसल्याने ही गर्दी अनावर होत आहे. अशीच गर्दी बुधवारी मासुळकर कॉलनी येथील वाईन शॉपीबाहेर पहायला मिळाली. या दुकानाबाहेर सकाळी १० वाजता दुकाने उघडण्यापूर्वीच अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त लांब रांगा लागल्या होत्या. दुकान बंद होईल, या भीतीपोटी काही मद्यप्रेमींनी पोती भरून, तर काही जणांनी अख्खा बॉक्स खरेदी केला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही मद्यपी एक फुटापेक्षा जास्त अंतर ठेऊन उभे होते, तर काहीनी गर्दी केली होती. रांगेत 60 वर्षीय व्यक्तीपासून ते तरुणांनी गर्दी केली होती. या गर्दीची गंभीर दखल घेऊन दुकानदार माईकद्वारे  सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना करत होते. असेच चित्र चिखली,  काळेवाडी, संत तुकाराम नगर,  थेरगाव,  चिंचवड, निगडी,  भोसरी या भागातही पाहायला मिळाले. काही मद्य ग्राहकांनी "आम्हाला दारू पिऊ द्या, कोरोनामुळे मरण्यापेक्षा पिऊन जगू द्या," अशा बेधडक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT