पिंपरी-चिंचवड

हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांना परवानगी मिळाली, पण...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे दीड महिन्यापासून बंद असणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांना काम करण्याची परवानगी देण्यात आली असली, तरी त्याठिकाणी कमीत कमी मनुष्यबळात सर्व्हर, युपीएची देखभाल हीच मुख्य कामे करण्यात येणार असल्याचे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले. 

आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. त्यामुळे सर्वजण सध्या घरातून काम करीत आहेत. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या बॅकअपची देखभाल नियमितपणे व्हावी, तसेच काम व्यवस्थितपणे सुरू राहावे, यासाठी आयटी कंपन्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, आयटी कंपन्यांमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबधित पोलिस ठाण्याकडून पास देण्यात आले आहेत. त्याआधारे त्यांना कंपनीमध्ये ये-जा करता येणार आहे. बॅंकिंग, मेडिकल, हेल्थकेअर, टेलिकॉम अशा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे काम या आयटी कंपन्या करीत आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या कालावधीत हे काम सुरळीतपणे सुरू राहावे, म्हणून आयटी कंपन्यांना कमी मनुष्यबळात काम करण्याची मुभा देण्यात आल्याचे सुरवसे यांनी नमूद केले. दरम्यान, आयटी कंपन्यांमध्ये ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने त्याठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. कंपनीमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तापमान तपासणे, कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कंपनीचा परिसर स्वच्छ ठेवणे या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. 


या कर्मचाऱ्यांना 'नो एन्ट्री' 

कोरोनोचा संसर्ग असणाऱ्या कंटेन्मेंट एरियामध्ये राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीत काम करण्याची परवानगी नाही. त्यामुळे आपल्याकडे कामासाठी येणारा कर्मचारी कोणत्या भागातून येत आहे, तो परिसर कंटेन्मेंट एरियामध्ये नाही ना, याची तपासणी कंपनी प्रशासनाने करणे आवश्‍यक आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT