पिंपरी-चिंचवड

#LockDown :...याला संचारबंदी म्हणायची का?

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे घराबाहेर पडू नका, असे आवाहन वारंवार करण्यात येत असले, तरी आम्ही ऐकणार नाही आणि रस्त्यावर गर्दी करणार असाच पवित्रा शहरातील नागरिकांनी घेतल्यामुळे वर्दळीत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. 

पिंपरीमधील लिंक रोड, चिंचवड अशा अनेक परिसरात बुधवारी (ता. 6) सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाला अनेकांनी फाटा दिल्याचे पाहायला मिळाले. अत्यावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांपैकी काही जणांनी तोंडावर मास्क लावले नसल्याचे चित्र काही ठिकाणी पाहायला मिळाले. भाजी विक्रेत्यांच्या भोवती अनेकजणांनी कोणतेही नियम न पाळता खरेदीसाठी गर्दी केली होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मद्यविक्री करणाऱ्या दुकानांच्या बाहेरही तशीच स्थिती पाहायला मिळाली. दरम्यान, पोलिसांची संचारबंदीवरील पकड ढिली झाली असून, नियम तोडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अशा मंडळींचे फावत असल्याचे अनेक भागात पाहायला मिळाले. लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले असले, तरी नागरिकांच्या सुरू असणाऱ्या मुक्‍त वावरामुळे शहरात संचारबंदी लागू आहे का, असा प्रश्‍न निर्माण अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT