पिंपरी-चिंचवड

वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेचा छळ; त्रासाला कंटाळून स्वत:ला घेतले पेटवून

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा मानसिक छळ केला. वंशाचा दिवा हवा, यासाठी वेळोवेळी त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळून विवाहितेने रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथे घडली. यामध्ये विवाहिता ५५ टक्के भाजली आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, आनंद छगनराव खैरनार, छगनराव सुखलाल खैरनार, कमलाबाई खैरनार, अलका कैलास ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

सतत मुली झाल्याच्या कारणावरून आरोपी त्यांना घालून पाडून बोलत होते. वंशाचा दिवा हवा यावरून त्यांना त्रास दिला जायचा. या रागाच्या भरात विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये त्या ५० ते ५५ टक्के भाजल्या असून, त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

PM Modi: "बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे"; PM मोदींचा पुन्हा ठाकरेंना साद घालण्याचा प्रयत्न?

Chabahar Port: चीनच्या पाकिस्तानमधील ग्वादार बंदराला भारताचे 'चाबहार'ने प्रत्युत्तर; इराणसोबत ऐतिहासिक करार

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

SCROLL FOR NEXT