Moshi Garbage Depot Fire Sakal
पिंपरी-चिंचवड

मोशी येथील कचरा डेपोला भीषण आग

लाखो टन कचरा एकत्रीत जमा केल्यामुळे त्यास डोंगराचे स्वरूप प्राप्त झालेले असून यास बुधवारी (ता.6) सायंकाळी पाचच्या दरम्यान भीषण आग लागली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - 35 लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या दैनंदिनितून निर्माण होणारा कचरा (Garbage) मोशी (Moshi) येथील कचरा डेपोमध्ये संकलित केला जातो. लाखो टन कचरा एकत्रीत जमा केल्यामुळे त्यास डोंगराचे स्वरूप प्राप्त झालेले असून यास बुधवारी (ता.6)सायंकाळी पाचच्या दरम्यान भीषण आग (Fire) लागली आहे.

आगीने रौद्र रूप धारण केलेले असून असंख्य धुराचे लोट आकाशामध्ये झेपावत आहेत. यामुळे हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याने पिंपरी-चिंचवडकरांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पालिका प्रशासनाची उदासीनतेच्या भूमिकेमुळेच कचरा डेपोला सातत्याने आग लागण्याचा प्रकार वारंवार घडत आहेत. आग लागण्याचे कारण नैसर्गिक आहे की हेतुपुरस्सर आग लावण्याचा मानव निर्मित प्रयत्न होत आहे ?असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.

कारण अशा वारंवार घडणाऱ्या कचरा डेपोतील घटनांमुळे शहारातील एकत्रीत होणारा कचरा नष्ट करण्याच्या शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्याऐवजी आगींच्या घटनांमुळे हा कचरा आपोआपच नष्ट होत असल्याने 'सुंठीवाचून खोकला गेला' अशी तर पालिका प्रशासनाची भूमिका नाही ना ? या शंकेला पुष्टी मिळत आहे .

कचरा डेपोतील वारंवार होणारे आगीचे प्रकार हे कशाचे द्योतक आहे ? महापालिकेने शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडलेला असून झालेल्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अन्यथा या विरोधात शहरात जन आंदोलन उभे करण्यात येईल याची पालिका प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी उदयसिंह पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam 2026 Postponed : MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 3 ऑक्टोबरपासून होणाऱ्या तीन महत्त्वाच्या मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; आयोग लवकरच जाहीर करणार नव्या तारखा

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Latest Marathi News Live Update: ९० कोटींच्या निविदेसाठी आयुक्तांना धमकी

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

SCROLL FOR NEXT