पिंपरी-चिंचवड

मावळात दिवसभरात ९५ पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात बुधवारी दिवसभरात ९५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले तर कोरोनाबाधित पाच जणांचा मृत्यू झाला. तळेगाव येथील ६६ वर्षीय, कुसगाव बुद्रुक येथील ७९ वर्षीय, जांबवडे येथील ६२ वर्षीय, इंदोरी येथील ५३ वर्षीय पुरुष तर कांब्रे ( आंदर मावळ ) येथील ६७ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. 

तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार १०७ तर मृतांची संख्या १३६ झाली आहे. ३ हजार ३८ जण कोरोना मुक्त झाले आहेत.

बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ९५ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक ३८,  तळेगाव दाभाडे येथील २९, वडगाव येथील पाच, चांदखेड येथील चार, वराळे व इंदोरी येथील प्रत्येकी तीन, सुदवडी, कांब्रे नामा, साळुंब्रे, काले, राजपुरी, घोणशेत, ऊर्से, सोमाटणे, ब्राम्हणवाडी, जांबवडे, गोवित्री, कांब्रे आमा व तळेगाव दाभाडे ग्रामीण येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार १०७ झाली असून त्यात शहरी भागातील २ हजार ३८४ तर ग्रामीण भागातील १ हजार ७२३ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक १ हजार २५२,   लोणावळा येथे ८८० तर वडगाव येथे रुग्णसंख्या २५२ एवढी झाली आहे. आत्तापपर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ३ हजार ३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ९० जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ९३३ सक्रिय रुग्ण असून त्यातील ५६६ लक्षणे असलेले तर ३६७ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ५६६ जणांमध्ये ४५७ जणांमध्ये सौम्य तर १०७ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. दोन जण गंभीर आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ९३३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT