CoronaVirus 
पिंपरी-चिंचवड

मावळात बुधवारी उच्चांकी १७ पॉझिटिव्ह: रुग्ण संख्या पोचली १७० वर

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळ तालुक्यात बुधवारी उच्चांकी १७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात तळेगाव येथील पाच, सुदुंबरे येथील तीन, कान्हे व कामशेत येथील प्रत्येकी दोन तर लोणावळा, शिरगाव, कातवी, साई, वराळे येथील प्रत्येकी एक जणाचा  समावेश असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ.चंद्रकात लोहारे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १७० झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामशेत येथील एका ७० वर्षीय व २६ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील आठ जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. कान्हे येथील एका ५० वर्षीय व २१ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील आठ जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 

तळेगाव येथील एक ५६ वर्षीय, एक ३२ वर्षीय व ४८ वर्षीय पुरुष तसेच एका ३४ वर्षीय व एका २९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील १४ जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 

सुदुंबरे येथील एका ४८ वर्षीय महिलेचा व तिच्या दोन मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील तीन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. भांगरवाडी (लोणावळा) येथील ३७ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. वराळे येथील ५० वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील चार जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. शिरगाव येथील ३५ वर्षीय पुरुषाचा, कातवी येथील ५४ वर्षीय पुरुषाचा, साई येथील २९ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, बुधवारी एका दिवसात १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १७० वर पोचली आहे. त्यात शहरी भागातील ६७ तर ग्रामीण भागातील १०३ जणांचा समावेश आहे. तळेगाव शहरात सर्वाधिक ५३ तर लोणावळ्यात रुग्ण संख्या १२ झाली आहे. आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून ७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी तेरा जणांना घरी सोडण्यात आले. सध्या ८३ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

अखेर बी.एड सीईटी झालीच नाही; सीईटी सेलचा भोंगळ कारभार; विद्यार्थ्यांचा गोंधळ, शेकडो विद्यार्थी मुकले परीक्षेला

दहावी बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारखा आल्या समोर

SCROLL FOR NEXT