पिंपरी-चिंचवड

कोरोना टेस्टवरती विश्वास ठेवू की नको; दोनदा टेस्ट निगेटिव्ह, तर एकदा पॉझिटिव्ह

सकाळ वृ्त्तसेवा

बेबडओहोळ (ता. मावळ) : 'आयुष्य असंच निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये जाणार का', अशी कैफियत तीन वेळा कोरोना टेस्ट केलेल्या मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील ३६ वर्षीय तरुणाने मांडलीय. 

या बाबत मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथील ३६ वर्षाचे तरुण म्हणाले, की आमच्या शेलारवाडी २९ जून रोजी तीन कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडले. मी त्यांच्या संपर्कात आल्याने मी त्या दिवसापासून माझ्या घरात डॉक्टरांच्या सल्लाने होम क्वारंटाइन झालो. कुटुंबापासून विलग राहायला लागलो. माझ्यात कोणतीच लक्षणे नव्हती, तरीही खबरदारी म्हणून एक जुलै रोजी पहिली टेस्ट सोमाटण्यातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये केली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर परत मी खात्री करावी म्हणून दोन जुलै रोजी दुसरी टेस्ट हिंजवडीतील रूबी हॉल हॉस्पिटल येथे केली, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

या प्रकारामुळे मी चांगलाच घाबरलो व आमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. तेव्हा ते मला म्हणाले, की कोणतीही लक्षणे नाही. तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा प्रश्न करत ते मला गंमतीने म्हणाले तू पॉझिटव्ह असेल, तर मी ही पॉझिटिव्ह पाहिजे. त्यामुळे पुन्हा अजून एक टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी तीन जुलैला तिसरी कोरोना टेस्ट पुणे महापालिका व क्रस्ना डायग्नोस्टिक संचलित खासगी लॅब येथे केली. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी रिपोर्टवर विश्वास न ठेवता माझ्या कुटुंबाची व माझी खबरदारी घेत चार जुलै रोजी स्वतःहून दुपारी अॅडमिट झालो.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, याबाबत तरुण म्हणाले, की तात्पर्य एवढेच की रुग्णालयावरील तपासणीवर विश्वास ठेवायचा का नाही. सहा व सात हजार रुपये तपासणीसाठी खर्च करूनही टेस्टवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहेच? 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT