पिंपरी-चिंचवड

पिंपरीतील आनंदनगर झोपडपट्टीसाठी माणुसकी आली धावून, बघा किती छान काम करताहेत

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : चिंचवड स्टेशन येथे कोरोना संकटग्रस्त आनंदनगर झोपडपट्टीमध्ये कष्टकरी लोक उपाशी राहू नयेत, यासाठी माणुसकीच्या नात्याला जागत अग्रसेन महाराज अन्नपूर्णा रसोईतर्फे दररोज सुमारे 2 हजार 700 लोकांना सकाळ-संध्याकाळ जेवण पुरविण्यात येत आहे. यापुढे तेथील लोकांना 'पॅक फूड' देण्याचा संस्थेचा विचार आहे. 

टाळेबंदी लागू झाल्यापासून चिंचवड स्टेशन येथील अग्रसेन अन्नपूर्णा रसोईतर्फे शहराच्या विविध भागांतील गरजू, गोरगरीब लोकांना दररोज जेवण पुरविले जात आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीचाही समावेश आहे. महापालिकेकडून या संस्थेला सुमारे दोन आठवडे गहू, तांदूळ आदी धान्य पुरविण्यात आले. मात्र, आता अग्रसेन अन्नपूर्णा रसोईकडून स्वखर्चाने गरजू लोकांना अन्न दिले जात आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संस्थेचे अध्यक्ष सुनील आगरवाल म्हणाले, "आम्ही शहरातील गरजू लोकांना टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून जेवण देत आहोत. आनंदनगरमध्ये आम्ही तयार जेवण देत होतो. परंतु, तेथील करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन आम्ही फूड पॅकेट देण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे अन्नदान करणारे कार्यकर्ते आणि गरजू माणसाचा एकमेकांशी संपर्क कमी होईल. सध्या महापालिकेचे काही कर्मचारी, स्थानिक नगरसेवकांचे कार्यकर्ते आणि आमच्या संस्थेचे कार्यकर्ते आनंदनगरमधील लोकांमध्ये जेवण देत आहेत. पालिकेकडून पूर्वी आम्हाला धान्य दिले जात असे. परंतु, मागील आठवडाभरापासून हे धान्य देणे बंद झाले आहे. त्यामुळे आम्ही आमच्यापरीने लोकांना जेवण देत आहोत. 31 मेनंतही अन्नवाटप चालू ठेवण्याचा आमचा विचार आहे. आनंदनगरखेरीज, विकासनगर, रुपीनगर भागांतील प्रतिबंधित क्षेत्रातही जेवण देण्याचे आमचे प्रयत्न राहतील.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी-चिंचवड बरोबरच पुण्यातही संस्थेनेकडून योगदान दिले जात आहे. या सामाजिक कार्यात संस्थेचे रमेश गोयल, विनोद मित्तल, मुकेश मित्तल, सुशील मित्तल, संदीप गुप्ता, ओंकार पारेख, नवीन बन्सल, आशिष गर्ग, सुजीत आगरवाल आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT