पिंपरी-चिंचवड

पिंपरी : परराज्यातून किंवा जिल्ह्यातून येताय... मग हे वाचाच... 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरात येणाऱ्या नागरिकांचे थर्मल गन आणि इतर आनुषंगिक तपासणी करून गृहविलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (ता. 10) या बाबतचा आदेश काढला. 

परराज्यात अथवा जिल्ह्यात अडकलेल्या विस्थापित कामगार, पर्यटक, विद्यार्थी, भाविक आणि अन्य व्यक्तींना जिल्ह्यात येण्यासाठी किंवा जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. अशांना शहरात येताना विविध सरकारच्या नियमांचे पालन करूनच यावे लागणार आहे. त्यानुसार अशा व्यक्तींना गृह विलगीकरणाचे पत्रक देऊन त्यांना गृहविलगीकरणाबाबत सूचित करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

गृहविलगीकरणाबाबतच्या सूचनांचे उल्लंघन केल्यास उल्लंघनाच्या दिवसापासून पुढे 14 दिवस त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल, याची त्यांना जाणीव करून देण्याकामी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अशा व्यक्ती जर रेड झोन भागातून शहरात आल्यास त्यांना 14 ऍक्‍टिव्ह विलगीकरण (उपचारासाठी रुग्णालयात दाखल) आणि पुढील 14 दिवस पॅसिव्ह विलगीकरण (उपचार घेऊन घरी गेल्यावर) राहण्याबाबत महापालिकेकडून सूचना देण्यात येत आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरामध्ये येणाऱ्यांसाठी अशी असेल प्रक्रिया : 

  • वैद्यकीय तपासणी करून आवश्‍यकतेप्रमाणे गृह विलगीकरण किंवा संस्थात्मक विलगीकरणाचा सल्ला दिला जाईल. तसा शिक्काही मारला जाईल. 
  • प्रवेशाच्या ठिकाणी पोलिस, महसूल, वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत थर्मल गन आणि इतर आनुषंगिक तपासणी करण्यात येईल.
  • परराज्यातून येणाऱ्या रहिवाशांच्या बाबतीत त्या राज्यातून शीर्ष अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र, मार्गक्रमण योजना आराखडा, वाहनाची परवानगी, प्रवासाचा कालावधी व त्या वाहनात अनुज्ञेय असलेल्या व्यक्ती त्या वाहनात असल्याची खात्री करण्यात येईल. 
  • अनुज्ञेय नसलेल्या व्यक्ती असल्यास पूर्ण वाहनाची तपासणी करून त्या व्यक्ती विलग करण्यात येतील. 
  • शहराअंतर्गत इतर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींनी येण्याबाबत पूर्वपरवानगी घेतली आहे, याची शहानिशा करण्यात येईल. 
  • इतर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना येताना प्रतिबंधित क्षेत्र व रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये मुक्काम केला आहे का, याची शहानिशा करण्यात येईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT