दगडाने ठेचून खून sakal
पिंपरी-चिंचवड

प्रेम प्रकरण, अपहरण मारहाण अन् खून; मोशीतील घटनेने पोलीसही चक्रावले

घटनेत अल्पवयीन आरोपींचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : प्रेमप्रकरण आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून युवकाचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा दगडाने ठेचून खून केला. एवढेच नव्हे तर, हत्येनंतर मृतदेह दुचाकीवरून नेत शेल पिंपळगाव येथील नदीपात्रात टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मोशी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अविनाश विसे (रा. शिवाजीवाडी, मोशी) याला अटक करण्यात आली असून, इतर नऊ अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा रेळेकर (वय १८, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश विसे (रा. शिवाजीवाडी, मोशी) याला अटक केली असून इतर नऊ अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुलांचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमप्रकरण आहे. या प्रेमप्रकरणातून तसेच जुन्या भांडणावरून आरोपींनी मंगळवारी (ता. १२) रात्री साडे नऊच्या सुमारास कृष्णा याचे अपहरण केले. त्यानंतर दगडाने त्याला मारहाण केली यामध्ये तो गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपींनी त्याला दुचाकीवरून चाकणजवळील शेलपिंपळगाव येथे नेले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मुलाचा मृतदेह नदीपात्रात फेकला. अल्पवयीन आरोपीने गुरुवारी पोलिसांकडे या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या सर्व घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT