MLA_Anna_Bansode 
पिंपरी-चिंचवड

'राजगृह तोडफोडीचा निषेध करा, पण...'; आमदार बनसोडे यांनी काय केलं आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : "मुंबईतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'राजगृह' या निवास स्थानावरील तोडफोडीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनीही या घटनेचा निषेध करताना कोणताही अनुचित प्रकार करु नये. तसेच शासकीय अथवा खासगी मालमत्तांचे नुकसान करू नये,'' असे आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे. 

या घटनेचा बनसोडे यांनीही तीव्र निषेध केला आहे. बनसोडे यांनी म्हटले आहे की, "राजगृहाच्या काचांवर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड झाली. घरातील कुंड्यांचेही त्यात मोठे नुकसान झाले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. या घटनेचा राज्यभर निषेध केला जात आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, या घटनेचा निषेध करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू देऊ नका. सर्वांनी शांततेच्या मार्गाने संयम बाळगून निषेध नोंदवावा. निरर्थक गर्दी करु नका. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी विनंती मी सरकारला करणार आहे.''

दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक केली. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात आला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे.

आंबेडकरी अनुयायांसाठी महत्त्वाचे ठिकाण असलेल्या या जागेची तोडफोड केल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी याचा निषेध व्यक्त करताना अजून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार बनसोडे यांनी केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चाळीतली खोली ते 2BHK फ्लॅट! BDDवासियांना मिळाल्या नव्या घरांच्या चाव्या, ८६४ रहिवाशांची स्वप्नपूर्ती

चाबहार पोर्टजवळ अमेरिकेचे हल्ले, लढाऊ विमानातून बॉम्ब फेकल्यानं विध्वंस; भारतासाठी हे महत्त्वाचं बंदर

दुबईत ड्रोन हल्ल्यानंतर विमान उड्डाणं स्थगित, १९ भारतीयांसह ३५ जणांना युएईत अटक

Success Story : वडिलांचं सलूनचं दुकान, लेक बनला पीएसआय कवठेपिरानच्या ओंकार जाधवची ‘एमपीएससी’ परीक्षेत बाजी

IPL : विराट कोहलीने निवडली RCB ची आवडती प्लेइंग इलेव्हन; अनिल कुंबळेसह स्टार्क-चहललाही संधी

SCROLL FOR NEXT