calling 
पिंपरी-चिंचवड

आमदारांचा फोन जाताच 'प्रिस्टीन'मधील पार्किंग समस्या लागली मार्गी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - चिखली-मोशी-चऱ्होली हाऊसिंग सोसायटीच्या फेडरेशनच्या माध्यमातून मोशी येथील प्रिस्टीन ग्रीन या 845 सदनिका असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील वाहनतळा बाबतचा विषय भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मार्गी लावला. त्यांनी बांधकाम व्यावसायिक गोयल यांना दूरध्वनी करून हा विषय सोडवण्याची सूचना दिली. तसेच, महापालिका बांधकाम विभागाचे उपअभियंता मोहिते व गुंडाळ यांना सोसायटीमधील वाहनतळ तपासणी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी कार्यवाही वेळी फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे, सोसायटीचे सभासद उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, महापालिका बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी सोसायटीत जावून सर्वेक्षण केले. साईड मार्जिन न सोडता सोसायटीच्या खुल्या जागेत ज्या ओपन पार्किंग बिल्डरने दिल्या होत्या त्या लगेच रद्द करून, पार्किंगच्या लावलेल्या पाट्या काढून टाकल्या. फेडरेशन व सोसायटी धारकांवर बिल्डरकडून नियमबाह्य पद्धतीने सोसायटीच्या खुल्या जागेत पार्किंग देऊन होणारा अन्याय दूर करून, नियमबाह्य काम करणाऱ्या बिल्डरला आमदार लांडगे यांनी दणका दिला. 

रहिवाशांनी दिला होता उपोषणाचा इशारा 
रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मनमानीविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. संबंधित व्यावसायिकाने मंजूर आराखडा मनमानीपणे बदलून सोसायटीधारकांची गैरसोय केली आहे. डी.सी. नियमांप्रमाणे पार्किंगचे मार्किंग केलेल नाही. पार्किंगचा एरिया आणि ऑनसाईट एरियामध्ये तफावत आहे. सायकल व स्कूटरचे पार्किंग नियमाप्रमाणे नाही. अतिउच्चदाब टॉवरखाली काहीही सुरक्षाव्यवस्था न करता पार्किंग दिली आहे. कॉमनस्पेसमध्ये सदनिकाधारकांना विश्वासात न घेता स्वत: पार्किंग अलॉटमेंट करणे, साईड मार्जिनमध्ये पार्किंग नियमबाह्य देणे आदी विविध समस्यांबाबत तक्रार करुनही महापालिका प्रशासन कारवाई करीत नाही. याविरोधात सदनिकाधारकांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आमदार लांडगे यांनी सोसायटीधारकांची भेट घेतली आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकास फैलावर घेतले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT