raj thackeray nashik Sakal
पिंपरी-चिंचवड

Raj Thackeray News: राजकीय पक्षांनी पाळलेले लोक आहेतच, त्यांच्यावर...; राज ठाकरेंचा पत्रकारांना सल्ला

रोहित कणसे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान आज (१९ ऑगस्ट) राज ठाकरे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथे राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राज्यातील पत्रकारांच्या सद्य स्थितीवर भाष्य केलं.

पत्रकारांवर हल्ले होत आहेत हे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे, असे राज ठाकरे म्हणाले . पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पत्रकारांना मोलाचा सल्ला देखील दिला. राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही लिहीता, व्यक्त होता त्यांनंतर तुम्हाला ट्रोल केलं जातं. पण ते तुम्ही वाचता कशाला? माझं भाषण, मुलाखत एकदा झाली की झाली. शब्द गेले की कोणाला काही वाटेल ते वाटेल.

तुम्ही कोणाला आवडलं ते पाहत बसू नका. मोबईल नावाचं खेळणं हातात आल्याने अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागले आहेत. त्यांना घरात बसून करायचं काय असा प्रश्न पडतो. मग असं ट्रोल केलं जातं. त्यांना इतिहास, बातमीचा विषय, पत्रकारिती काही माहिती नसतं. ते फक्त व्यक्त होतात. राजकीय पक्षांनी पाळलेले लोकही आहेतच. त्या पाळलेल्या लोकांवर कशाला प्रतिक्रिया देता, असा प्रश्नही राज ठाकरेंनी पत्रकारांना विचारला.

त्यांना दर महिन्याला ते लिहायचे पैसे मिळतात, त्यांचा कशाला विचार करता. जे महाराष्ट्र हिताचं असेल ते नर्भिडपण लिहीनं बोलण महत्वाचे आहे, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

CJP आंदोलनाचा व्यापाऱ्यांना फटका, २ हजार कोटींचं नुकसान; व्यवसाय ठप्प, CTIने केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT