pimpri  sakal
पिंपरी-चिंचवड

बाळाच्या जन्मासाठीही शोधले जाताहेत मुहूर्त; उच्चभ्रू वर्गात रुजत आहे फॅड

मातेच्या जिवाशी होतो खेळ

सुवर्णा नवले

पिंपरी : चांगल्या गोष्टीसाठी मुहूर्त पहिला जातो, मात्र, मुहूर्त कोणत्या गोष्टींसाठी पहावा यालाही मर्यादा आहेत. घरात बाळ जन्माला येणे ही सर्वांसाठी आनंददायी बाब असली तरी त्यासाठी मुहूर्त शोधणे हे मात्र बाळ व बाळाच्या आईच्या आरोग्यासाठी घातक आहे. पती किंवा पत्नीचा वाढदिवस अथवा लग्नाच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून बाळ जन्माला घालण्याचे प्रमाण वाढले असून हे फॅड सध्या उच्चभ्रू वर्गात रुजत चालले आहे. परंतु, सिझेरियन (सी सेक्शन) प्रसूती वैद्यकीयदृष्ट्या मातेला व जन्माला येणाऱ्या बाळाच्या दृष्टीने काही अंशी धोकादायक ठरू शकते, याचे भान बाळाच्या माता-पित्याना नसल्याने दिसून येते.

सामान्य प्रसूतीसाठी ४० आठवडे पूर्ण भरावे लागतात. बाळाचे वजन अडीच किलोपेक्षा जास्त असल्यास ते सुदृढ असल्याचे लक्षण आहे. परंतु, दिवस भरलेले नसताना प्रसूती होणे आई व बाळासाठी तसे धोकादायक आहे. यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊनच प्रसूती केली जाते. गर्भवतीचे सिझेरियन अनेक कारणांमुळे केले जाते.

त्यामध्ये दिवस भरलेले आहेत, परंतु, बाळाचे वजन कमी आहे किंवा इतर काही कारणे आहेत अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिझेरियन होते. तारखेच्या आतमध्ये कोणतीच प्रसूती करण्याचा सल्ला डॉक्टर देत नाहीत. बाळाच्या वाढीप्रमाणेच डॉक्टर योग्य तो सल्ला देतात. परिणामी, प्रसूतीमध्ये अडथळा बाळाच्या दृष्टीने घातक आहे. तारखेलाच प्रसूती हवी अशावेळी बाळाचा रक्तपुरवठा कमी झाला किंवा बंद झाला तर जोखीम निर्माण होते.

प्रसूतीमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता

कोणत्याही प्रसूतीचा योग्य तो कालावधी असतो. त्याला कोणत्याही तारखेमध्ये गृहीत धरून प्रसूती केली जात नाही. सिझेरियन करण्यासाठी प्रसूतिशास्त्रात अशा काही अटी आहेत. कुटुंबीयांच्या मर्जीनुसार मुहुर्तानुसार प्रसूती करावयाची असल्यास सामान्य किंवा सिझेरियन प्रसूतीमध्ये डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागते. उपचारामध्ये बरेच बदल केल्याने प्रसूतीमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे खासगी रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितले.

उदाहरण

वाकडमधील उच्चभ्रू कुटुंबातील दोघेही पेशाने अभियंता. दोघांच्याही वाढदिवसाच्या मुहूर्तावर म्हणजे १५ ऑगस्टला लग्न झाले. अपत्य दोन वर्षांनी होईल, असा निर्णय घेतला. नंतर गरोदरपण आले; पण बाळ जन्माला येण्याची तारीखदेखील त्यांना त्यांच्या वाढदिवसालाच हवी होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने सिझेरियन करण्याचे ठरले. आठ महिने १० दिवस उलटून गेले होते. परंतु, एका खासगी दवाखान्यातील डॉक्टरांना त्यांनी सिझेरियन आठ दिवस लांबवण्याची गळ घातली. मग १५ ऑगस्ट दिवस जुळवून आणला.

तारखेनुसार सिझेरियन लांबवण्यासाठी बरेच हौशी कुटुंबीय आमच्याकडे मागणी करतात. आश्चर्य वाटते. त्यांना डॉक्टरांचा योग्य तो सल्ला आम्ही देत असतो. परंतु, कुटुंबीयांची अशी मानसिकता घातक आहे.

- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT