पिंपरी-चिंचवड

सावधान! कोरोनाबरोबर आता 'या' आजारांशी लढायचंय

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग कायम असतानाचा सुरू होणाऱ्या मॉन्सूनमध्ये फ्लू, ऍलर्जीक सर्दी, पोटाचे आजार यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या तिन्हीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना इंडियन मेडिकल असोसिएशकडून करण्यात आली आहे. 

पावसाळा सुरू झाल्यानंतर फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागते. याखेरीज ऍलर्जीक सर्दी असणाऱ्यांना बदललेल्या हवामानाचा त्रास होतो. दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांवर देखील त्याचा परिणाम होतो. पावसाळ्यात पाण्यामध्येदेखील बदल होतो. त्यामुळे पोटाच्या आजारांना निमंत्रण मिळते. यंदाच्या पावसाळ्यात आपल्या साथीला या आजारांच्या बरोबरच कोरोना असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची आवश्‍यकता असल्याचे असोसिएशनचे सचिव डॉ. सुधीर भालेराव यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे गेलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने या गोष्टी करण्याकडे लक्ष द्या... 

  • काम नसेल तर पावसात बाहेर पडण्याचे शक्‍यतो टाळा. 
  • घराबाहेर पडताना मास्कचा वापर कायम करा. 
  • भाज्या, फळे आणल्यानंतर शक्‍यतो ती कोमट पाण्याने धुऊन घ्या. स्वयंपाक करताना स्वच्छ केलेल्या भाज्यांचा वापर करा. 
  • तुम्हाला काही झालेले नसले, तरी बाहेरुन आल्यानंतर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करा. 
  • पावसाळ्यात शरीरातील पाणी कमी होणार नाही, याकडे लक्ष द्या. दिवसभरात भरपूर पाणी प्या. 
  • बाहेरील पदार्थ खाण्याचे पूर्णपणे टाळा. 
  • सध्या कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला याची लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. औषध घेतल्यानंतर देखील सर्दी, ताप कमी न झाल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य त्या आरोग्य चाचण्या करून घ्या. 
  • घरामध्ये कुणाला फ्लू झाला असेल, त्याचा संसर्ग रोखण्यासाठी त्यांना घरामध्येच आयसोलेट करावे. 
  • पावसाळ्यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs PBKS Live: पंजाबच्या यष्टिरक्षकाने सहकाऱ्याला चेंडू फेकून मारला... मग काय, गडी पेटला अन् पुढच्या ३ चेंडूंत धिंगाणा घातला

‘भूत बंगला’ ट्रेलर प्रदर्शित: १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शनचा धमाका, थरार आणि विनोदाचा अनोखा संगम!

'या' अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी माता करणार या 4 राशींकडे गृहप्रवेश ! संपत्ती आणि सुखाची भरभराट

Ambajogai News : स्वारातीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्याने संपविले जीवन; कारण अस्पष्ट

IPL 2026 : हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स, MI vs RR सामना खेळणार की नाही? मुंबईच्या कोचचे वैभव सूर्यवंशीबद्दलही विधान

SCROLL FOR NEXT