Covid Warriors Agitation Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कोविड योद्धांचे ‘आऊटसोर्सिंग’ विरोधात महापालिकेसमोर आंदोलन

कोविड योद्धाना न्याय मिळावा. मानधन तत्त्वावर कायम ठेवावे, या मागणीसाठी कोविड योद्धा बचाव कृती समितीने महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोविड योद्धाना न्याय मिळावा. मानधन तत्त्वावर कायम ठेवावे, या मागणीसाठी कोविड योद्धा बचाव कृती समितीने महापालिका प्रवेशद्वारासमोर आज (ता.२८) आंदोलन केले. या आंदोलनात ‘‘ठेकेदारी हटवा, महापालिका वाचव’, ‘नही चलेगी नही चलेगी, ठेकेदारी नही चलेगी’, ‘ठेकेदारीचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे’, ‘ठेकेदारी हटाव, कोरोना योद्धे बचाव’’ असे फलक हातामध्ये घेत महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या खासगीकरणाविरोधात मोठ्यासंख्येने सहभाग घेतला.

महापालिकेच्या विविध रुग्णालयांत खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ पुरविण्यास सत्ताधारी भाजपने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडिकल स्टाफसह इतर कर्मचाऱ्यांची आऊटसोसिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे. या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांची दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या खासगीकरणाला मानधनावरील कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. ‘कोविड योद्धाना न्याय मिळावा, मानधन तत्त्वावर कायम ठेवावे’, ‘समान काम समान वेतन द्यावे, आम्हाला ठेकेदारीमध्ये टाकू नका,’ ११ महिने करार पद्धतीने कामावर ठेवा, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात, अशा मागण्या मानधनावरील कर्मचाऱ्यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT