MP Shrirang Barne Sakal
पिंपरी-चिंचवड

MP Shrirang Barne : देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये श्रीरंग बारणे

देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे.

पिंपरी - लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे ‘गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक’ संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या ‘टॉप-टेन’मध्ये मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. १४८ वेळा चर्चेत सहभाग आणि ५०८ प्रश्‍न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत.

देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत. भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन असे खासदार पहिल्या दहाच्या यादी आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांची सभागृहातील उपस्थितीती ९४ टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. सोळाव्या लोकसभेत देखील कामकाजात खासदार बारणे अग्रभागी होते. सतराव्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे. या कामगिरीमुळे खासदार श्रीरंग बारणे यांना सलग सातवेळा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दरम्यान; राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे अग्रभागी आहेत. तर, शिवसेनेचे श्रीकातं शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.

मावळच्या जनतेने माझ्यावर सलगदोनवेळा विश्वास टाकला. देशाच्या संसदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरेल असे कामकाज करत आहे. संसदेतील कामकाजात सक्रियपणे सहभाग घेवून मतदारसंघातील प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवितो. प्रश्न मार्गी लावून घेतो. पहिल्या दहा खासदारांमध्ये दुसरा क्रमांक आल्यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढेही मावळच्या जनतेची अशीच सेवा करत राहील.

- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा मतदारसंघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT