पिंपरी-चिंचवड

मुळशीतून विसर्ग वाढविला; वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडीला अतिदक्षतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मुळशी धरणातून आज शुक्रवारी, सकाळी दहा वाजेपासून 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे आता एकूण विसर्ग 16 हजार 247 ने सुरू झाला आहे. मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी, बोपखेल, पुण्यातील खडकी, बाणेर, बोपोडी, औंध गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत मुळशी धरण प्रमुख (टाटा पॉवर) बसवराज मुन्नोळी यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका पूर नियंत्रण कक्ष, पुणे-पिंपरी-चिंचवड, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता पिरंगूट, मुळशी तहसीलदार मुळशी व पोलिसांना कळविले आहे. 

मुळशी तालुक्यात मुळा नदीवर मुळशी धरण आहे. मुळा नदी मुळशी तालुक्यातून येऊन वाकड व बाणेरच्या शिवेवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदीचा संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पुण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आहे. येथून पुढे मुळा नदी पुण्यात मुठा नदीला मिळते. येथून पुढे त्यांची ओळख मुळा-मुठा अशी होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुळशी धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो. त्यामुळे कृपया धरणाच्या खालील भागातील नदीकाठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. विजेवरील मोटारी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच, पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवीत वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन मुन्नोळी यांनी केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, टपरीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; नवश्या मारूती परिसरात दुर्घटना

Latest Marathi News Live Update : KDMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Income Tax: आयकर विभागाकडून सर्व 7 ITR फॉर्म जारी! कुणासाठी कोणता फॉर्म, ITR-U आणि ITR-V नेमकं काय समजून घ्या

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

SCROLL FOR NEXT