eoffice system sakal
पिंपरी-चिंचवड

Pimpri News : पालिकेचा पेपरलेस कारभारावर भर! ई-ऑफिस प्रणालीतून कामकाज होणार गतिमान

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणून पेपरलेस कारभार होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- प्रदीप लोखंडे

पिंपरी - प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणून पेपरलेस कारभार होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु केली आहे. याचाच एक भाग म्‍हणून ई-टपाल आणि डॉक्‍युमेंट मॅनेजमेंट सिस्‍टम म्‍हणजेच कागदपत्रांचे व्यवस्थापन करणारी प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्‍याद्वारे शासकीय अभिलेखांचे इलेक्‍ट्रॉनिक (संगणकीय) स्वरूपात जतन केले जाणार आहे. त्यामधील माहिती कोणत्याही वेळी त्वरीत व जलदगतीने उपलब्ध होणार आहे.

महापालिका असो की शासकीय कार्यालयांचे कामकाज नागरिकांना नेहमीच लालफितीच्या कारभाराचा त्रास होत असतो. महापालिकेकडे नागरी सुविधांबाबत तक्रार, एखादा परवाना अथवा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला; तर बऱ्याच वेळा अनेक चकरा माराव्या लागतात. कधी अर्जच सापडत नाही; तर कधी अर्ज कोणत्या टेबलवर आहे? कुठल्या अधिकाऱ्यांकडे अर्ज प्रलंबित आहे? याची माहिती नागरिकांना बऱ्याच वेळा मिळत नाही.

नागरिकांच्या या लालफितीच्या कारभाराबाबतच्या तक्रारी दूर व्हाव्यात म्हणून महापालिकेने प्रशासकीय कामात पारदर्शकता, गतिमानता आणण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या पुढाकाराने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.

१९ जून २०२४ पर्यंत नस्‍त्‍यांची निर्मिती होणार

नवीन प्रणालीची अंमलबजावणी करताना ती कार्यप्रणाली समजून घेण्याच्‍या उद्दिष्टाने सुरूवातीला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे १३ जून २०२४ रोजी महापालिकेच्‍या मधुकर पवळे सभागृह (स्थायी समिती सभागृह) येथे कागदपत्रांचे व्‍यवस्‍थापन करणारी प्रणाली (डीएमएस) चे प्रशिक्षण होणार आहे. हे प्रशिक्षण पार पडल्‍यानंतर डीएमएस प्रणालीमध्ये संबंधित विभागांनी १९ जून २०२४ अखेर किमान नस्त्या (फाईल्स) तयार करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्‍या आहेत.

डीएमएस प्रणालीमध्ये नस्त्या तयार करताना प्रत्यक्ष तांत्रिक अडचणी, त्रुटी असल्यास तसे निरीक्षण विभाग प्रमुखांनी लेखी स्वरूपात माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच प्रशासन विभागास कळविण्याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत. विभाग प्रमुखांनी नोंदविलेल्या निरीक्षणाची पूर्तता मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांच्‍यामार्फत होणार आहे.

दस्तऐवजाबाबत हे प्रशिक्षण मिळणार...

  • व्यवस्थापन प्रणालीचे कशी वापरायची ?

  • व्यवस्थापन साधनांचा उपयोग

  • सुरक्षेचा शिष्टाचार समजून घेणे

  • संचयन आणि पुनर्प्राप्ती प्रणाली

  • स्कॅनिंग आणि इंडेक्सिंग तंत्र

प्रशिक्षणाकरीता या विभागांची निवड

  • सामान्य प्रशासन विभाग

  • कामगार कल्याण

  • क्रीडा

  • महिती व तंत्रज्ञान

  • स्थापत्य

  • करसंकलन

  • वैद्यकीय विभाग

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पेपरलेस कारभाराला सुरूवात केली आहे. त्‍या अनुषंगाने सर्व कागदपत्रांचे संगणकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून कार्यपद्धती समजून घेण्यासाठी पहिलेच प्रशिक्षण आयोजित केले आहे. सहा महिन्‍यांत नवीन प्रणाली कार्यान्‍वित करण्याचा मानस आहे.

- निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, महापालिका

सहा महिन्‍यांत प्रणाली कार्यान्वित होणार

ई-टपाल व डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम प्रणालीचे काम कार्यान्‍वित करण्याबाबत आयुक्‍तांनी सूचना दिल्‍या आहेत. त्‍यानुसार, स्‍मार्ट सिटीमार्फत ॲटोस या संस्‍थेकडून हे काम सुरू आहे. त्‍यासाठी कामकाजाला सुरूवात झाली आहे. सहा महिन्‍यांत नवीन प्रणाली विकसित करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्‍यावतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pannalal Surana : सामान्यांचा आधार हरपला! ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांचे निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Fake IAS Kalpana Case: म्हणे, ‘मीच उसने दिलेले पैसे परत केले’; बोगस आयएएस कल्पनाचा खात्यातील ३२ लाखांसंबंधी दावा

Viral Story : IAS वर्गात अचानक शांतता! राजनाथ सिंहांनी एक साधा प्रश्न विचारताच ६०० अधिकारी थांबले… तुम्ही उत्तर देऊ शकता का?

दुर्दैवी घटना ! 'अहिल्यानगर ट्रॅक्टरमध्ये साडी अडकून महिलेचा मृत्यू'; वीटभट्टीवर चिखल करताना नेमकं काय घडलं..

Nagpur Accident: सुटीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नेरपिंगळाई शोकसागरात, लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT